Subscribe Us

header ads

तरुणींनी ओढणीच्या साह्याने नदीत बुडणाऱ्या मुलाचे वाचवले प्राण

बीडच्या अंबाजोगाई येथील बुटेनाथ परिसरात तरुणींनी दाखविलेल्या धाडसाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
बुटेनाथ परिसरातील एका नदीच्या प्रवाहात एक मुलगा अडकून पडला होता. चार तरुणींनी त्यांच्या ओढण्या एकत्रित करून त्या मुलाला वाचविण्याचा प्रयत्न केला.
तब्बल अर्ध्या तासानंतर त्या मुलाला वाचविण्यात यश आले. तब्बल अर्धा तास हा थरार सुरू होता.
नदीच्या प्रवाहात अडकून पडलेला मुलगा बराच वेळ आकांत करत होता. नेमकंच त्या ठिकाणी काही तरुणी फिरण्यासाठी गेल्या होत्या आणि मुलगा प्रवाहात अडकल्याचे दिसले. चार तरुणींनी त्यांच्या ओढण्या एकत्रित करून त्या मुलाला वाचविण्याचा प्रयत्न केला. तब्बल अर्ध्या तासानंतर त्या मुलाला वाचविण्यात यश आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा