Subscribe Us

header ads

प्रभाग क्र. 12 बलेपीर मध्ये समाजसेवक शेख मोहसीन यांनी सुरू केली मोफत मतदार व ईश्रम नोंदणी

 बीड स्पीड न्यूज

बीड (प्रतिनिधी) - शहरातील बालेपीर भागाच्या प्रभाग क्र. 12 मध्ये समाजसेवक शेख मोहसीन बुरहानोद्दीन यांनी मोफत मतदार व ईश्रम नोंदणी सुरू केली असून याचे उद्घाटन लोकसेना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. इलयास इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी लोकसेना संघतनेचे तालुकाध्यक्ष अतीख अहमद खान , व अझर खान जाफर खान यांची उपस्थिती होती. मतदार यादी व ईश्रम यादीमध्ये नाव लावणे नवीन मतदान कार्ड आणि ई-श्रम कार्ड मिळविण्यासाठी संपर्क कार्यालय बालेपीर येथे सना फंक्शन हॉल समोर, मुस्कान फंक्शन हॉल समोर व परीवार टी हाऊस या तीन ठिकाणी उघडण्यात आले आहे. या मोफत सेवेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन लोकसेना संघटना प्रमुख प्रा. इलयास इनामदार यांनी केले. यावेळी समाजसेवक शेख मोहसीन, अतीख अहमद खान, अज़हर खान, जाफर खान, ऐड. कलीम काज़ी, शेख नदीम मेंबर, अब्दुल जब्बार, जमील भाई, मोबीन भाई, परवेज भाई, सिकंदर भाई, चांद भाई आणि प्रभाग़ातील समस्त नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा