Subscribe Us

header ads

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी हा बंद कडकडीत राहणार; असल्याचे सांगत जनतेला या बंदला स्वत:हून पाठिंबा देण्याचे आवाहन

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे घडलेल्या हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रातही उमटत आहेत. या हिंचाराबद्दल राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत खेद व्यक्त करणारा ठराव मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने उद्या (११ ऑक्टोबर) ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज (रविवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी हा बंद कडकडीत राहणार असल्याचे सांगत, जनतेला या बंदला स्वत:हून पाठिंबा देण्याचे व यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केलं आहे.
उत्तर प्रदेश राज्यातील लखीमपूर खीरी येथील शेतकऱ्यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीने उद्या ‘महाराष्ट्र बंद’ची हाक पुकारली आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. तसेच, या बंदला राज्यातील जनतेची साथ मिळण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी आज जनतेला बंदमध्ये सामील होण्याची विनंती करतील. शेतकऱ्यांविरोधी कृषी कायदे करून केंद्रीय जुलमी सरकार आता शेतकऱ्यांची हत्या करत आहेत. या विरोधात जनता नक्कीच ‘बंद’ला साथ देईल, असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला आहे.
या हत्यांमागे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाचा हात असल्याचे जनतेने दाखवून दिले, तरी त्यावर अजून कारवाई होत नाही. केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या गावात ही घटना घडली आहे. त्यामुळे त्यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी देखील मलिक यांनी केली आहे.


हा बंद कडकडीत राहील – नवाब मलिक


आज रात्री १२ वाजेनंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने लखीमपूर खेरी येथे ज्या शेतकऱ्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्या घटनेच्या विरोधात बंद पुकारलेला आहे. आज दिवसभर संध्याकाळपर्यंत आमचे तिन्ही कार्यकर्ते लोकांना भेटून विनंती करणार आहे की, उद्या या बंदमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे. हा बंद कडकडीत राहील. जनता या बंदमध्ये निश्चितपणे सहभागी होईल. हा बंद केंद्रातील जुलमी सरकार जे शेतकरी विरोधी आहे, शेत मालाची लुटीसाठी कायदे करण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांच्या हत्या करत आहेत, या घटनांच्या विरोधात आहे.” असं मलिक यांनी सांगितलं आहे.


गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी तत्काळ राजीनामा द्यावा – नवाब मलिक


केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाचा या घटनेत हात होता, असं इतके दिवस लोक सांगत असताना, त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नव्हती. सर्वोच्च न्यायलायाने हस्तक्षेप केल्यानंतर काल त्यांना अटक केली गेली. आमची मागणी आहे की केंद्रीय गृहराज्यमंत्री जे देशातील गृहखात्याचे मंत्री आहेत. त्यांच्या गृहराज्यात त्यांच्या गावात ही घटना घडली. अगोदर ते शेतकऱ्यांना चेतावणी देत होते. नंतर लोकांची हत्या करण्यात आली. आमची मागणी आहे की तत्काळ त्यांचा राजीनामा झाला पाहिजे. शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी, शेतकऱ्यांच्या मागे संपूर्ण देश उभा आहे, हे दाखवण्यासाठी सर्वांनी बंदला पाठींबा दिला पाहिजे, सहभागी झालं पाहिजे.” असं नवाब मलिक म्हणाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा