Subscribe Us

header ads

दारूच्या नशेत ट्राफिक पोलिसांची तरुणास बेदमपणे मारहाण; बीड येथील शिवाजी महाराज चौकातील प्रकार ; जखमी तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु, संबंधीत पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी

 बीड स्पीड न्यूज

बीड प्रतिनिधी_कसलीही चूक नसताना आँनलाईन 1200 रुपयांचा दंड का टाकला ? म्हणून विचारणा करण्यास गेलेल्या एका तरुणाला दारुच्या नशेत तर्र असलेल्या चार ट्राफिक पोलिसांनी बेदमपणे मारहाण केली. हि घटना रविवारी रात्री घडली असून यामध्ये सदरील तरुणाच्या डोळ्याला व डोक्याला गंभीर मार लागला आहे. जखमी तरुणावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान दारूच्या नशेत मारहाण करणाऱ्या चार पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी जखमी तरुणाने जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे. जखमी तरुणाचे नाव प्रविण आर्जुनराव काळे (रा.आनंदगाव ता.शिरुर हल्ली मु.बीड) असे आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, जखमी प्रविण काळे हा तरुण रविवारी रात्री नगर रोडवरील पोलिस पेट्रोल पंप येथे माझी कार (क्र.-एम.एच.01 ए.एल.2648) घेऊन दुध आणण्यासाठी गेला होता. तो तेथे कार रोडच्या बाजूला लावून दुध घेण्यासाठी उतरला. त्यावेळी तेथे ट्राफिक पोलिस जावळे व इतर तीन कर्मचारी आले, व त्यांनी कार येथे का लावली म्हणून प्रविणला विचारणा केली. त्यावेळी प्रविणने त्यांना कार रोडच्या बाजूला असल्याचे सांगितले. मात्र ट्राफिक पोलिसांनी 500 रुपयांची मागणी केल्याचा आरोप प्रविणने केला असून तो न दिल्याने पोलिस कर्मचारी जावळे व इतर तिघे कारचा फोटो काढून शिवाजी महाराज चौकाकडे निघून गेले.यानंतर थोड्याच वेळात प्रविणला 1200 रुपयांचा आँनलाईन दंडाचा मेसेज पडला. त्यामुळे प्रविण हा याप्रकरणी विचारणा करण्यासाठी शिवाजी महाराज चौकात जाऊन त्याने तुम्ही माझी काहीच चूक नसताना देखील 1200 रुपयांचा दंड का टाकला ? म्हणून संबंधीत पोलिस कर्मचाऱ्यांना विचारणा केली. यावेळी तु खुपच शहाणा आहे, 500 रुपये मागितले तर दिले नाही, आता 1200 रुपये दंड भर म्हणून सांगितले. दरम्यान प्रविणने तुम्ही कायद्याचा गैरवापर करत आहात म्हणून जाब विचारताच जावळे व इतर तीन पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रविणला तोंडावर चापटा तसेच बुक्क्यांनी बेदमपणे मारहाण केली. ते चौघेही यावेळी दारुच्या नशेत असल्याचे प्रविणने सांगितले आहे.


 शिवाजीनगर पोलिसांनी घेतली नाही तक्रार…

मारहाणीत प्रविणच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे, तर डोक्यात देखील गंभीर मार लागला. यानंतर तो जखमी अवस्थेत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेला असता, तेथे तक्रार घेण्यात आली नाही. तर उपचार घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले. मात्र आपली चूक झाल्याची व दारुच्या नशेत केलेले कृत्य आपल्या अंगलट येण्याची शक्यता आल्याने पाठीमागेच मारहाण केलेले ट्राफिक कर्मचारी जावळे व इतर तिघे देखील गेले, व प्रकरण मिटवून घे म्हणून दमदाटी करु लागले. मात्र प्रविणने स्पष्ट नकार दिल्याने संबंधीत पोलिस कर्मचाऱ्यांनी लँबमधील अल्कोहोल तपासणी करणारास 500 रुपये देऊन निघून गेले असा आरोप जखमी तरुणाने केला आहे.

प्रकार सीसीटीव्हीत कैद, जावळे व इतर तीन पोलिसांवर कारवाई करा..

सदरील सर्व प्रकार हा शिवाजी महाराज चौकात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असेल, तरी आपण सदरील फुटेज पाहून सत्य परिस्थिती तपासून पाहू शकता. जावळे व इतर तीन कर्मचारी दारुच्या नशेत कर्तव्यावर होते. त्यांना मी पैसे दिले नाही म्हणून बेदमपणे मारहाण केली. तरी जावळे व इतर तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई करुन मला ज्ञाय द्यावा.

प्रविण आर्जुनराव काळे
जखमी तरुण

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा