Subscribe Us

header ads

केंद्रात मोघलांचं सरकार, शेतकऱ्यांना चिरडणे म्हणजे सत्तेची मस्ती, - : सुप्रिया सुळे

मुंबई_राज्यात महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे चार शेतकऱ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. लखीमपूर खेरी जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ७० किमी अंतरावर टिकुनिया येथे झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी चार शेतकरी होते. दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असल्या तरी सत्ताधारी पक्षांनीच आवाहन केल्याने बंदला प्रतिसाद मिळत आहे. या बंदला आधी व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला होता. मात्र, नंतर नरमाईची भूमिका घेत बंदला पाठिंबा असल्याचे व्यापाऱ्यांनी जाहीर केले आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील भाष्य केले आहे. बंद मोडून काढण्याची भाषणा करणारे मूर्ख आहेत असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.शेतकऱ्यांचा रोष आणि संताप समजून घेण्याची गरज आहे. बंद मोडून काढण्याची भाषा करणारे मूर्ख आहेत. लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडणाऱी जीप महाराष्ट्रात असेल तर आणावी रस्त्यावर, असं म्हणत राऊत यांनी थेट भाजपाला आव्हान दिलं आहे. लोकांनी उत्स्फूर्तपणे बंद केलाय. बंद १०० टक्के यशस्वी आहे. किरकोळ घटना घडल्या असतील तर बंद असताना जगभरात घडतात,” असं राऊत म्हणाले आहेत. शेतकरी न्यायाच्या प्रतिक्षेत असून शेतकऱ्यांना चिरडण्याच्या प्रवृत्तीविरोधात आमचा विरोध आहे. आज संपूर्ण देश महाराष्ट्राकडे पाहत आहे, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.


भाजपाकडून शेतकऱ्यांना चिरडून मारण्याचं अप्रत्यक्ष समर्थन-  जयंत पाटील


महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आणि आमचे मित्र पक्ष यांच्यावतीने हा बंद आम्ही पुकारला आहे. या बंदचं कारण म्हणजे भाजप आजपर्यंत देशातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत होती. दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. भाजपला त्यांचं राजकीय मत आग्रहाने मांडायचं आहे हे समजू शकतो, पण लखीमपूरसारखी घटना जाणीवपूर्वक केलेलं हत्याकांड आहे,” असे जयंत पाटील म्हणाले.


शेतकऱ्यांना चिरडणं म्हणजे सत्तेची मस्ती – सुप्रिया सुळे


ही सत्तेची मस्ती आहे बाकी काही नाही. तुम्ही तो शेतकऱ्यांना चिरडण्याचा व्हिडीओ पाहा, तुम्हाला त्यात माणूसकी दिसते आहे का? पत्रकार असो, समाजकारणी असो पण सर्वात आधी आपण माणसं आहोत. हे चुकीचं आहे, क्रुरता आहे हे तुम्हाला वाटत नाही का? कुणाचंही सरकार असो उत्तर प्रदेशमध्ये जी कृती झाली ती निंदाजनक आहे. केंद्र सरकारने भारताच्या नागरिकांना, शेतकऱ्यांना न्याय द्यावा,” असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

मुंबईत कडक सुरक्षा

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर राज्याची राजधानी मुंबईत सुरक्षा कडक करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक गस्त घालण्यात येणार असल्याचे पोलिसांनी रविवारी सांगितले. महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) तीन कंपन्या, ५०० होमगार्ड आणि स्थानिक शस्त्र युनिटमधील ७०० जवानांसह स्ट्राइकिंग साठा देखील मोक्याच्या ठिकाणी तैनात केला जाणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा