बीड स्पीड न्यूज
आष्टी_ आष्टी च्या तहसीलदार राजाभाऊ कदम यांची बदली रद्द करावी या मागणीसाठी नागरिकांनी नगर-जामखेड-बीड राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. राजाभाऊ कदम हे मागील वर्षापासून आष्टी तहसीलदार पदावर कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात कामात पारदर्शकता आल्याने सर्वसामान्यांना न्याय मिळत होता. असल्याची भावना येथील नागरिकांची आहे. दरम्यान, तहसीलदार कदम यांची नुकतीच आष्टी येथून देगलूर येथे बदली करण्यात आली आहे. बदली रद्द करण्यात यावी या मागणीसाठी टाकळी अमिया, रूईनालकोल, सराटेवडगांव, कडा येथील नागरिकांनी रास्तारोको केला. या आंदोलनात अनिल ढोबळे, प्रा. राम बोडखे, सावता ससाणे, संजय नालकोल, रहेमान सय्यद, किशोर घोडके, बाबासाहेब शिरोळे, विष्णु निंबाळकर आदी ग्रामस्थ सहभागी होते. यावेळी आष्टी पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, पोलिस हवालदार बाबासाहेब गर्जे, बाबासाहेब राख, बंडु दुधाळ, मंगेश मिसाळ, मंडळ अधिकारी प्रियंका घोडके, तलाठी नवनाथ औदकर यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. यानंतर महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा झाला.
0 टिप्पण्या