Subscribe Us

header ads

बघतोय काय रागानं… पेट्रोलनंतर डिझेलचं सुद्धा शतक करुन दाखवलंय वाघानं; मुंबईत झळकले मोदींचे बॅनर्स

बीड स्पीड न्यूज 

मुंबई_पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा वाढ करण्यात आलीय. सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये लिटरमागे ३५ पैशांनी वाढ केलीय. या दरवाढीबरोबरच ऑक्टोबर महिन्यातील एकूण इंधन दरवाढ ही साडेचार रुपये प्रती लिटरपर्यंत पोहचली आहे. आजची दरवाढ ही या महिन्यातील १५ वी दरवाढ ठरलीय. याच इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आज मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून पेट्रोल पंपांसमोर आंदोलन करण्यात आलं.पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाकडून मुंबईतील अनेक पेट्रोल पंपांसमोर आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये पेट्रोल पंपांवर मोदींचे 


बॅनर्स झळकावण्यात आले. या पोस्टरवर मोदी मुंबईतील पेट्रोलपंपावर लावलेल्या मोदींच्या बॅनर्सवर मोदी हाताने प्रश्नार्थक इशारा करताना दिसत आहेत. बॅनरर्सवर ‘बघतोय काय रागानं… पेट्रोलनंतर डिझेलचं सुद्धा शतक करुन दाखवलंय वाघानं’, असं लिहिण्यात आलं आहे. आंदोलकांनी पेट्रोल पंपासमोर केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजीही केली.दरम्यान, इंडियन ऑइल कॉर्परेशन लिमिटेडने आज म्हणजेच २० ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या नवीन दरांनुसार दिल्लीमध्ये इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल १०६.१९ रुपये लिटर तर डिझेल ९४.९२ रुपये लिटरपर्यंत पोहचलं आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर लिटरमागे ११२.११ रुपये तर डिझेलचे दर १०२.८९ रुपयांवर पोहचलेत.


ऑक्टोबरमध्ये १५ वेळा वाढले दर…

ऑक्टोबर महिन्यामध्ये आतापर्यंत १५ वेळा इंधनाचे दर वाढवण्यात आले आहेत. मागील तीन दिवस आणि इतर दोन दिवस वगळल्यास रोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. ऑक्टोबर महिन्यामध्ये पेट्रोल ४.४५ रुपयांनी महाग झालं आहे तर डिझेल पाच रुपयांनी महागलं आहे. कच्च्या तेलाचे भाव वाढत असल्याने त्याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरांवरही होताना दिसतोय.


या राज्यांमध्ये पेट्रोल शंभरीपार…

मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, दिल्ली, ओदिशा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलच्या दरांनी शंभरी गाठली आहे. मेट्रो शहरांपैकी मुंबईमध्ये पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत. केंद्र सरकार आकारत असणाऱ्या करांबरोबर प्रत्येक राज्यामध्ये राज्य सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या कराची टक्केवारी वेगळी असल्याने वेगवेगळ्या राज्यांमधील दर वेगवेगळे असतात.


चार मुख्य शहरांमधील पेट्रोल डिझेलचे प्रति लिटर दर खालीलप्रमाणे : –

दिल्ली – पेट्रोल १०६.१९ रुपये प्रति लिटर, डिझेल ९४.९२ रुपये प्रति लिटर
मुंबई – पेट्रोल ११२.११ रुपये प्रति लिटर, डिझेल १०२.८९ रुपये प्रति लिटर
चेन्नई – पेट्रोल १०३.३१ रुपये प्रति लिटर, डिझेल ९९.२६ रुपये प्रति लिटर
कोलकत्ता – पेट्रोल १०६.७७ रुपये प्रति लिटर, डिझेल ९८.०३ रुपये प्रति लिटर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा