Subscribe Us

header ads

लक्षवेधी डुबकी लगाव आंदोलनाने बिंदुसरा दणाणली; नदी अस्तित्वात आल्यापासून प्रथमच झाले असे आंदोलन

बीड (प्रतिनिधी) - शहरातील खासबाग-मोमीनपुरा  जोडणाऱ्या बिंदुसरा नदीवरील नियोजित पुलाच्या निर्माणासाठी सोमवार दिनांक ११ ऑक्टोबर रोजी नदीपात्रात लक्षवेधी डुबकी लगाव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात देण्यात आलेल्या घोषणेने कधी नव्हे ते बिंदुसरा नदी पहिल्यांदाच दणाणली शिवाय ही नदी अस्तित्वात आल्यापासून प्रथमच नदीपात्रात असे आंदोलन करण्यात आल्याने जिल्हाभरात याची चर्चा सुरू झाली आहे.बिंदुसरा नदीपात्रात खासबाग-मोमीनपुरा जोडण्यासाठी अत्यावश्यक असलेला, या दोन्ही भागातील शहरवासीयांच्या जिव्हाळ्याचा असलेला नदीवरील नियोजित पुलाचे निर्माण कार्य व्हावे अशी मागणी गेल्या पाच वर्षापासून सातत्याने शासन-प्रशासनाकडे निवेदनाच्या माध्यमातून करण्यात येत असून सुद्धा या पुलाचे गांभीर्य या दोन्ही स्तरावर गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून आल्याने लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने शहरातील मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़, सामाजिक कार्यकर्ते सय्यद इलयास, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, रमेशराव गंगाधरे, शेख युनूस, संदीप कदम, शेख मुबीन, मोमीन आसेफ़ यांनी येथील नियोजित पुलाचे निर्माण कार्य लवकरात लवकर सुरू व्हावे म्हणून लक्षवेधी डुबकी लगाव आंदोलन केले. या आंदोलनात आंदोलनकर्त्यांसह इंजि. मुहम्मद मोईजोद्दिन, सय्यद आबेद, इंजि. मोमीन तारेख हे प्रत्यक्ष सहभागी झाले होते. सकाळी ११ वाजता सुरू झालेले हे आंदोलन दुपारी १२ वाजेपर्यंत चालले. या दरम्यान आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या खासबाग-मोमीनपुरा जोडणारा बिंदुसरा नदीवरील नियोजित पुल होत कसा नाही ? झालाच पाहिजे ! येथे पुल व्हायलाच हवा ! अशा घोषणांनी नदीपात्र दणाणून सोडले होते. विशेष म्हणजे बिंदुसरा नदी अस्तित्वात आल्यापासून नदीपात्रात अशाप्रकारे प्रथमच आंदोलन करण्यात आल्याने याची चर्चा जिल्हाभरात होत आहे.

पोलीस प्रशासनाची कर्तव्यदक्षता 

डुबकी लगाव आंदोलनासाठी पेठ बीड पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उपनिरीक्षकांसह सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अत्यंत दक्षपणे आंदोलनासाठी नियोजन केले होते. कारण नदीपात्रात सध्याही कमरेच्या वर पाणी वाहत आहे. यामुळे काही अघटीत व अप्रिय घटना घडू नये म्हणून अग्निशामक दलाची गाडी आणि कर्मचारी सुद्धा पाचारण करण्यात आले होते. तसेच नदीपात्राच्या पूर्वेला पेठ बीड पोलिस ठाणेचे पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा लवाजमा होता तर पश्चिमेस शहर पोलीस ठाणेचे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा लवाजमा आंदोलनकर्त्यांवर दक्षतेने नजर ठेवून होता. यामुळे आंदोलन स्थळी जमलेले शेकडो नागरिकांनी पोलिस प्रशासनाच्या कर्तव्यदक्षतेचे कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा