Subscribe Us

header ads

शेतात काम करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विजेचा करंट लागुन जागीच मृत्यू

 बीड स्पीड न्यूज

अंबाजोगाई प्रतिनिधी_शेतामध्ये काम करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विजेचा तारेचा करंट लागुन मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे.तालुक्यातील मौजे मंमदापुर पाटोदा येथील जर्नाधन तुकाराम जोगदंड (वय 40) वर्ष हे गावातील अशोक बुरगे यांच्याकडे दोन वर्षांपासून सालगडी म्हणून काम करत होते. आज सकाळी अकरा वजता मित्रांना भेटुन शेतात काम करायचे आहे म्हणून तेरगुळ मळा नामक शेतात गेले.काहीवेळाने शेजारील शेतकरी हे जोगदंड यांना भेटण्यासाठी आले असता जर्नाधन हा पावसामुळे ओलेचिंब झालेल्या शेतात विहिरी जवळ विजेचा तारेचा करंट लागून पडलेल्या अवस्थेत आढळूनआले.उपचारासाठी स्वाराती रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.पावसामुळे शेतकऱ्यांची अगोदरच सुफडासाफ झाला आहे.शेतातील चिखलाने विजेचा करंट लागुन सालगड्याचा मृत्यू झाला आहे.जर्नाधन यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,दोन मुली असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंब उघड्यावर पडले आहे.जोगदंड कुटुंबीयांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा