Subscribe Us

header ads

केंद्र सरकारच्या निषेधार्थ आ.संदिप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली मोटर सायकल रॅली जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन; बंद यशस्वी करण्यासाठी व्यापार्‍यांना केली विनंती

बीड (प्रतिनिधी):- उत्तर प्रदेश येथील लखीमपुर खेरी येथे आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांवर गाडी चालवून 4 शेतकर्‍यांना ठार करण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या बंदमध्ये बीड शहरातील सर्व व्यापारी सहभागी झाले होते. सकाळी आ.संदिप क्षीरसागर यांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ शहरातून मोटर सायकल रॅली काढत व्यापार्‍यांना आपआपले व्यवहार बंद ठेवण्याची विनंती केली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले.केंद्र सरकारने 3 कृषी कायदे आणलेले आहेत. हे कायदे परत घेण्यात यावे यासाठी गेल्या दहा महिन्यापासून दिल्ली येथे शेतकर्‍यांचे आंदोलन चालू आहे. उत्तर प्रदेश येथील लखीमपुर खेरी येथे शेतकर्‍याचे आंदोलन सुरू असतांना केंद्रीय राज्यमंत्र्याच्या मुलाने शेतकर्‍याच्या अंगावर गाडी घालून 4 शेतकरी ठार केले. या घटनेचा सर्वस्तरातून निषेध होत असून या प्रकरणी दोषी विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज महाआघाडीच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार बीड जिल्ह्यात बंद यशस्वीपणे पार पडला. बीड शहरामध्येही बंदमध्ये व्यापार्‍यांनी उर्त्स्फुत सहभाग नोंदवला. सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ.संदिप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली 

राष्ट्रवादी भवनापासून बीड शहरामध्ये रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये केंद्र सरकारचा निषेध करत शहरातील व्यापार्‍यांना दुकाने बंद करण्याची विनंती करण्यात आली. रॅलीनंतर आ.संदिप क्षीरसागर यांनी आपल्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले. यावेळी माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, माजी आ.उषाताई दराडे, ज्येष्ठ नेते अ‍ॅड.डी.बी.बागल, उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, अ‍ॅड.हेमाताई पिंपळे, अ‍ॅड.प्रज्ञा खोसरे,  कमलताई निंबाळकर, विद्याताई जाधव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. हा बंद यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका पदाधिकार्‍यांनी प्रयत्न केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा