Subscribe Us

header ads

पैठण- सावळेश्वर येथील ऊंदरी नदीवरील पुलावर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा 2 तास रास्ता रोको

5 दिवसांत नुकसान भरपाई द्या अन्यथा जिल्ह्यात कोणत्याही मंत्र्यांना फिरु देणार नाही शेतकरी पुत्रांचा इशारा!!

केजःप्रतीनीधी_केज तालुक्यातील पैठण -सावळेश्वर च्या उंदरी नदीवरील  मध्यभागी पुलावर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा आज रस्ता रोको झाला या रास्ता रोको मध्ये नायगाव,पैठण,पाथरासावळेश्वर,आनंदगाव,जवळबन,आवसगाव,वाकडी येथील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन आज शुक्रवारी सकाळी दि 1 ऑक्टोबर 2021 रोजी 8 ते 10 या वेळेत अंबाजोगाई-कळंब राज्य महामार्गावरील सावळे श्वर -पैठण  येथील उंदरी नदीवरील पुलावर दीड तास रास्ता-रोको आंदोलन केले यात अतिवृष्टी ग्रस्त शेतकरी, महिलांनी आपल्या व्यथा कथन केल्या तसेच अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातील नुकसानीचा पाढा वाचला तर तर सावळेश्वर येथील चंद्रकांत भिवाजी करपे  या शेतक-याला सांगताना आपले अश्रुअनावर झाले .तर मजुर महिलांनी मनोगत व्यक्त करताना सांगीतले कि शेतकरीवर्गाचे पीक पाण्यात गेले तर मजुरी कशी मीळनार शेतकरी तरला तर मजुर तारेल नाहितर मजुरही मरेल शेतक-यालाहि अर्थिक मदत द्या व मजुरालाही  मदत द्या तर आवसगाव येथील पूरग्रस्त शेतक-याने घरातील संसार उपयोगी साहित्य जीवनावश्यक वस्तु वाहुन गेल्याने कशी उपासमारीची वेळ आली ते कथन केले . स्वाभिमानी शेतकरीसंघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे  यांनी बोलताना अक्रमक पवित्रा घेत शेतक-याचा अंत पाहुनका ज्या शेतकरीवर्गाला पेरनी करता येते त्यांना कापनी व छाटनी करता येते हे लोकप्रतिनिधींनी ध्यानात ठेवाव व पूरग्रस्थांना लागलीच अर्थिक मदत व जीवनावश्यक वस्तुचा पुरवठा करावा ,तसेच गतवर्षीचा व चालू खरीप हंगामातील  पीकविमा तात्काळ द्या निवेदनात नमूद मागण्या 5 दिवसांत मंजूर करा अन्यथा जिल्ह्यात कोणत्याही मंत्र्यांना येथील शेतकरी पुत्र फिरू देणार नाहीत असे सांगीतले .या रास्तारोकोला महिलांची व शेतमजुरांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती तहसिल प्रशासनाकडुन शेतकरीवर्गाचे निवेदन स्विकारण्यासाठी नायब तहसिलदार सचिन देशपांडे यांनी स्वीकारले व सर्वतोपरी मदतीचे आश्वासन देन्यात आले.या रास्तारोकोत पंचक्रोशीतील पूरग्रस्थ शेतकरी महिला वर्ग मजुर वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होता .पोलीस प्रशासनाकडुन हि सकारात्मक सहकार्य लाभले व युसुफ वडगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला हे अंदोलन शांततेत पार पडले .तसेच यावेळी प्रशासनास आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांकडून नासुन गेलेलं सोयाबीन सह अन्य पिकांची झाड भेट स्वरूपात दिली यावेळी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, भाजपा च्या किसान मोर्चा चे रमेश पोकळे ,अखिल भारतीय मराठा महासंघाचे विभागीय विधि आघाडी प्रमुख ऍड. सुधीर चौधरी,रमेश पोकळे,मावळा विचार मंचचे गोविंद शिनगारे,संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष राहुल खोडसे,सचिन साखरे,मांजरा विकास प्रतिष्ठान चे प्रवीण खोडसे, मराठा महासंघाचे दत्ता शिनगारे,पत्रकार मनोराम पवार, सरपंच रुस्तुम चौधरी, सरपंच पिंटू मस्के, उप सरपंच अंकुश करपे, शेखर थोरात,अरविंद थोरात,सरपंच शिवाजी शिंपले, संदीप करपे, सरपंच प्रवीण पवार, सरपंच गणेश राऊत ,अशोक भोगजकर, सरपंच सुधीर रानमारे,योगेश अंबाड, प्रमोद पांचाळ, सुनील शिनगारे, घनश्याम साखरे, प्रशांत चौधरी, अशोक साखरे, नवनाथ काकडे, सुग्रीव करपे, अविनाश करपे, दिगंबर करपे, गोविंद करपे, ताराचंद गायकवाड आदी होते सडलेले सोयाबीन, चिखल, वाळू,दगड गोटे निवेदनासह प्रशासनास भेट दिले.या रस्ता रोको आंदोलनात शेतकऱ्यांनी नुकसान झालेले सोयाबीन, पुराणे वाहुन आलेले दगड, वाळू ,चिखल नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांचेकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भेट दिले.सरकार विरोधी व , शेतकऱ्यांच्या एकजुटीच्या जिंदाबाद या आक्रमक घोषणा देत आंदोलन तीव्र स्वरूपाचे केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा