Subscribe Us

header ads

मौलाना कलीम सिद्दिकींची सुटका करा महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठानचे जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतींना निवेदन


बदनापूर हाफीज हारून पठाण: महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान तर्फे जालना जिल्हाधिकारी मार्फत देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, मौलाना कलीम सिद्दीकी यांची अटकेतून सुटका करावी.अशी मागणी संघटने तर्फे करण्यात आली.
निवेदनात नमूद केले आहे की, मौलाना कलीम सिद्दीकी यांना युपी एटीएस ने विनाकारण अटक केली असून मौलाना हे शांती आणि एकतेचा संदेश देणारे निष्कलंक व देशातील एक प्रसिद्ध व्यक्तीमत्व आहे.आजपर्यंत त्यांनी देशातील एकता आणि शांतता कायम राहिल यासाठी सदैव प्रयत्न केलेले आहे.एटीएसने त्यांना अटक केली असुन त्यांची तात्काळ सुटका करावी.अशी मागणी बदनापूर महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान तर्फे करण्यात आली.यावेळी महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठानाचे जिल्हा अध्यक्ष.हाफिज हारुन पठाण, बदनापूर तालुका अध्यक्ष. शेख अखबर शेख सांडु, ता. सचिव मिर्झा सफरोज बेग, ता. कोषाध्यक्ष अध्यक्ष. सय्यद भिक्कन. मुफ्ती समीर सहाब,हाफीज. अ. हक्क डांगे, मिर्झा जावेद बेग, शेख मुश्ताक भाई, सलीम पठान शेकटा, शेख अजहर बदनापूरकर. हाजी परवेज. शफीक कुरेशी. रफीक कुरेशी. फैसल चाउस. वसीम पठाण. फयाज पठाण. जावेद कुरेशी. समीर कुरेशी. सय्यद अन्सार. शे.अफरोज.आदींचे स्वाक्षरी होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा