Subscribe Us

header ads

श्री महिला उद्योग समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी भागवत वैद्य यांची निवड

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

बीड प्रतिनिधी :  महाराष्ट्र मध्ये पत्रकार संघाच्या माध्यमातून केलेले सामाजिक कार्य, संघटन आणि बीडमध्ये महिला बचत गटाच्या महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ,त्याचप्रमाणे बचत गटातील महिलांना आर्थिक बचतीचे महत्त्व व वेगळ्या उद्योगाचे प्रशिक्षण देऊन महिलांना स्वलंबी बनवल्यामुळे पुरोगामी पत्रकार संघ सलग्न श्री महिला उद्योग समितीच्या प्रदेशाध्यक्ष पदी संस्थापक-अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी भागवत वैद्य यांची श्री महीला उद्योग समितीच्या प्रदेश अध्यक्ष पदी निवड केली . बीड येथे प्रथमच महिला उद्योग परिषद आयोजित केली होती.बीड जिल्ह्यामध्ये महिला बचत गटातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या मुळे व महिलांना आर्थिक बचतीचे महत्त्व पटवून दिले आणि महिलांना उद्योगाच्या माध्यमातून सक्षम बनल्याने व पत्रकार संघाचे संघटक या नात्याने संघाचे संघटन  करून वेगवेगळे उपक्रम राबवून आणि कार्यक्रम आयोजित करणे .त्याचबरोबर श्री महिला उद्योग समितीचे संघटन करण्यासाठी योग्य असे कार्य करतील अशी आशा पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केली आहे . या समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र मध्ये प्रत्येक जिल्हा ,तालुका लेव्हलवर श्री महिला उद्योग परिषद आयोजित करून पुरुष व महिलांना उद्योग क्षेत्रामध्ये मोलाचे सहकार्य करणार अशी ग्वाही भागवत वैद्य यांनी दिली आहे. मासाहेब प्रेरणा सामाजिक संघटना कार्यालयामध्ये सत्कार प्रसंगी भागवत वैद्य म्हणाले की, वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रामध्ये आपले नाव लौकिक महिला व पुरुषांनी करावे. यासाठी सर्वतोपरी मदत व सहकार्य शासन प्रशासन च्या माध्यमातून करण्याचे असूनही यावेळी बोलताना  माहिती दिली .या निवडीबद्दल मासाहेब प्रेरणा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कू.प्रेरणा सूर्यवंशी ,पुरोगामी  पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी, प्रदेश उपाध्यक्ष दशरथ रोडे यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा