Subscribe Us

header ads

मागासवर्गीयांच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी तीव्र आंदोलन करणारं---- नगरसेवक अँड विकासजी जोगदंड


बीड स्पीड न्यूज 

बीड (प्रतिनिधी) 25 आक्टोंबर सरकार भाजपचं असो किंवा काँग्रेसचं दोन्ही पक्षाचा अजेंडा मागासवर्गीय बहुजनांच्या विरोधात असुन मागासवर्गीयांची अधोगती करणे सर्वच मार्गाने त्यांचा विकास खुंटवणे हा एककलमी कार्यक्रम सध्या देशात सुरु आहे सामाजिक न्याय विभागा अंतर्गत मागासवर्गीयांसाठी असणाऱ्या कल्याणकारी योजना गुंडाळ्या असुन महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळ,संत रविदास महामंडळ सध्या शेवटची घटका मोजत आहेत समाजातील अनेक होतकरू सुशिक्षित बेरोजगार तरुणाचा आधार हिरावुन घेतला जात आहे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकाळ अतिशय निष्क्रिय असुन सामाजिक न्याय विभागाला लागलेली कीड काढायची असेल तर आता लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन केल्या शिवाय पर्याय नाही म्हणून भिम स्वराज्य सेनेच्या वतीने समाजाच्या हितासाठी आंदोलन करणार असल्याचे सांगत जो पर्यंत न्याय मिळतं नाही तो पर्यंत लोकशाही मार्गाने लढा सुरु ठेवणार असल्याचे *भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक अँड विकास जोगदंड यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातुन सांगितले आहे*

         
*धनंजय मुंडे को हटावो*
*सामाजिक न्याय विभाग बचावो" हा नारा देत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणारं असुन 2 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शने करण्यात येणार असल्याचे ही संघटनेच्या वतीने पत्रकातुन कळविण्यात आले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा