Subscribe Us

header ads

परळी तालुक्यातील आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे धनंजय मुंडेंनी केले सांत्वन नाथ प्रतिष्ठाणकडून प्रत्येकी 1 लाखांची मदत; पुरात वाहून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या घरीही धनंजय मुंडेंनी दिली सांत्वनपर भेट

बीड स्पीड न्यूज 

परळी (दि. 24) ---- : परळी तालुक्यातील टोकवाडी, देशमुख टाकळी तडोळी येथील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या भेटी घेऊन पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी आज त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना धनंजय मुंडे यांनी ते अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठाण या सामाजिक संस्थेच्या वतीने प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत केली आहे. त्याचबरोबर पांगरी येथील पुरात होऊन मयत झालेल्या ज्ञानोबा शिंदे यांच्या कुटुंबियांचे देखील धनंजय मुंडे यांनी भेटून सांत्वन केले तसेच त्यांना शासनाच्या वतीने 4 लाख रुपयांचा धनादेश यावेळी सुपूर्द करण्यात आला. 

परळी तालुक्यातील टोकवाडी येथील नंदकुमार काळे, देशमुख टाकळी येथील नागोराव शिंदे, तडोळी येथील नवनाथ सातभाई या शेतकऱ्यांनी मागील काही दिवसात आत्महत्या केल्या आहेत. या कुटुंबांच्या ना. धनंजय मुंडे यांनी आज भेटी घेऊन त्यांचे सांत्वन केले व प्रत्येकी एक लाखांची मदत केली. यावेळी शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या मदतीचीही कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात यावी अशा सूचना ना. मुंडे यांनी उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांना दिल्या. त्याचबरोबर अस्वलांबा येथील ऊसतोड कमागर सागरबाई जाधव यांचा अपघाती मृत्यू झाला होता, जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन ना. मुंडे यांनी जाधव कुटुंबियांना नाथ प्रतिष्ठाण च्या वतीने एक लाख रुपयांची मदत केली आहे.

पांगरी येथील पुरात वाहून मयत झालेल्या ज्ञानोबा शिंदे यांच्या कुटुंबियांची देखील ना. मुंडे यांनी सांत्वनपर भेट घेऊन शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या 4 लाख रुपये मदतीचा धनादेश शिंदे कुटुंबियांना देण्यात आला. यावेळी परळी नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक अण्णा कराड, डॉ. राजाराम मुंडे, पंचायत समिती सभापती बालाजी मुंडे,राष्ट्रवादी काँग्रेस तालूका अध्यक्ष लक्ष्मण पौळ संजय गांधी समिती अध्यक्ष राजाभाऊ पौळ राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष गोविंद कराड, पं.स.सदस्य वसंत तिडके उपसरपंच श्रीनिवास मुंडे पोलीस पाटील माऊली मुंडे, वै.स.का.संचालक ज्ञानोबा मुंडे सरपंच विष्णूपंत देशमुख ,माणीकराव सातभाई,भरत शिंदे,वसंत देशमुख  तसेच उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, नायब तहसीलदार बाबुराव रुपनार आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा