Subscribe Us

header ads

सोन्याची माणसं प्रतिष्ठान च्या वतीने 'गौरी गणपती सजावट स्पर्धा' बक्षीस वितरण संपन्न

पुणेः-येथील "सोन्याची माणसं प्रतिष्ठान" च्या वतीने गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.विविध विषयानुसार स्पर्धकांनी सजावटीचे आयोजन केले होते.आकर्षक सजावटींची निवड करुन बक्षीस वितरण करण्यात आले.आंबेगांव(बु.) भागातील 'सोन्याची माणसं प्रतिष्ठान' च्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही "गौरी गणपती स्पर्धा " चे आयोजन केले होते.प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ.सोनालीताई नाशिककर यांनी संस्थेच्या सामाजिक ,सांस्कृतिक ,शैक्षणिक  क्षेत्रातील कार्याची माहिती यावेळी  दिली.तर कोषाध्यक्षअभिषेक मिसाळ यांनी कोरोना संकट काळात केलेल्या मदतकार्याचा आढावा यावेळी बोलतांना दिला.याप्रसंगी बेलदरे पेट्रोलियमचे संचालक व भाजपा नेते संदीपभाऊ बेलदरे ,सनब्राईट स्कुलच्या संचालिका सौ.शुभांगीताई बेलदरे,सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी खाडे,संगीता चौधरी आदी मान्यवरांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करुन समाधानपर मनोगत व्यक्त केले.आकर्षक सजावटीमध्ये निवड झालेल्या स्पर्धकांना प्रथम (सोन्याची नथ)सानिका चांदगुडे, द्वितीय (मोत्यांचा तनमणी)विद्या ढवारे,तृतीय(चांदीचा करंडा)सारिका चव्हाण तर चतुर्थ (उत्तेजनार्थ)राजश्री सोनार व सहभागी स्पर्धकांनाही प्रमाणपत्र मान्यवरांच्याहस्ते देण्यात आले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आत्माराम ढेकळे व आदिती कुंभोजकर यांनी केले.प्रथम,द्वितीय ,तृतीय क्रमांकाचे बक्षीस सोनाई ज्वेलर्स तर ट्राफी,प्रमाणपत्र ,भेटवस्तु प्रतिष्ठान व संदीपभाऊ बेलदरे यांच्या सहकार्यातुन करण्यात आले होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सत्यम नाशिककर मित्र मंडळ सहकारी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा