Subscribe Us

header ads

घाटसावळी येथे चोरांनी अनेक घरे फोडली

प्रतिनिधि नवनाथ गोरे

बीड तालुक्यातील घाटसावळी येथे रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. लांडे वस्ती येथील घरात चोरी करून घरातील नगदी दहा हजार व काही साहित्य पळविले आहे . त्याचबरोबर गावात येऊन एका घरात चोरी करून नगदी पाच हजार रुपये चोरून नेले.लांडे वस्तीवरील विलास अंधारे यांच्या घरी चोरी करून अज्ञात चोरट्यांनी घरातील नगदी दहा हजार रुपये व इतर साहित्य चोरून नेले. त्यानंतर चोरट्यांनी घाटसावळी येथील पत्रकार आनंद लांडे यांच्या घरी चोरी करून घरातील नगदी पाच हजार व एक किलो तुप चोरले. अन्य ठिकाणीही चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. या चोरीच्या घटनेने ग्रामस्थात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी चोरी करताना घरातील साहित्य अस्ताव्यस्त केले आहे. चोरांने धुमाकूळ  घातल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा