Subscribe Us

header ads

जातीसंदर्भातील आरोपांमुळे समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार?; सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंचं सूचक वक्तव्य!!

बीड स्पीड न्यूज 

पुणे_अमली पदार्थ विरोधी पथकाचे (एनसीबी) अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची चिन्हं दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी वानखेडेंसंदर्भातील एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे. वानखेडेंच्या जात प्रमाणपत्रासंदर्भात कोणी तक्रार दाखल करुन आक्षेप घेतला तर सामाजिक न्याय मंत्रालयाच्या मार्फत वानखेडेंची चौकशी केली जाईल असं मुंडे म्हणाले आहेत. मुंडेच्या अंतर्गत येणाऱ्या सामाजिक न्याय मंत्रालयाकडून यासंदर्भातील तपासाचे संकेतच या वक्तव्यातून त्यांनी दिलेत.शनिवारी पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना मुंडे यांनी हे वक्तव्य केलं. समीर वानखेडे यांच्या जातप्रमाण पत्राच्या वैधतेबद्दल कोणी आक्षेप घेतला, त्यासंदर्भात सामाजिक न्याय विभागाकडे तक्रार केली तर आम्ही या प्रकरणी चौकशी करु, असं मुंडे म्हणाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडेंवर अनेक गंभीर आरोप केलेत. त्यामध्येच त्यांनी समीर वानखेडे हे मुस्लीम असून त्यांनी मुस्लीम असल्याचं लपवत चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेसमध्ये नोकरी मिळवल्याचा आरोपही केलाय. यावरुनच मुंडे यांनी या इशारा दिलाय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा