Subscribe Us

header ads

मुकादमाने डांबुन ठेवल्याने बीडच्या ऊसतोड मजुराचा संशयास्पद मृत्यू!!

बीड स्पीड न्यूज 

केज_बीड तालुक्यातील सफेपुर गावातील ऊसतोड मजुर बाळासाहेब सोपान घोडके (वय ४०) वर्षे यांचा केज च्या शिक्षक कॉलनीतील एका बिल्डींगमधील रुम मध्ये मुकादमाने डांबुन ठेवले होते. या दरम्यान मजुराचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.केज मधील शिक्षक कॉलनीतील मुकादम आणि बिल्डिंग मालक जिवराज हांगे याच्या बिल्डींगमधल्या एका बंद रूममध्ये हा मृतदेह आढळून आला आहे.मुकादम जिवराज केशव हांगे याने २८ ऑक्टोबर ला बाळासाहेब घोडके यांना बीड तालुक्यातील सफेपुर गावातुन गाडीत बसवून आणले आणि केजमध्ये डांबुन ठेवल्याचा आरोप नातेवाईकांकडुन केला जात आहे. दरम्यान नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.यादरम्यान केज पोलिस स्टेशन चे पी.एस.आय प्रमोद यादव, पोलिस कर्मचारी गुजर, भोले, अहंकारे हे घटनास्थळी दाखल झाले असुन पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून नातेवाईक आक्रमक  झाले होते. तर मुकादम हांगे याला अटक करण्याची मागणी मृताच्या नातेवाईकांकडून केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा