Subscribe Us

header ads

अब्दुल वाहेद गुलाम मोहम्मद आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

बीड स्पीड न्यूज 

बीड (प्रतिनिधी)- येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन बीड येथे दि.24 ऑक्टोबर रोजी द स्कुल एक्सप्रेस यांच्यातर्फे आयोजीत केलेला आदर्श शिक्षक पुरस्कार 2021 हा अब्दुल वाहेद गुलाम मोहम्मद सहशिक्षक मिल्लीया प्राथमिक शाळा, धारुर यांना शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते देण्यात आला.यावेळी गटशिक्षणाधिकारी तुकाराम जाधव, विस्तार अधिकारी चोपडे सर, मुप्टा संघटना बीड अध्यक्ष शाहेद कादरी सर, उर्दु संघटना अध्यक्ष काझी मुशाहेद सर, साधन व्यक्ती इसाक सर, शेख युसूफ सर, शेख वसीम, अलताफ सर व इतर उपस्थित होते.सतत शाळा व विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट कार्य करणारे अब्दुल वाहेद सरांनी गेल्या वर्षात तामीर चमन पुस्तक प्रकाशित केले होते. त्यांचे कार्य वाहून त्यांना मिल्लीया शाळा व संघटनेकडून पुरस्कार देण्यात आलेले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा