Subscribe Us

header ads

चारचाकी वाहनाने जोराची धडक दिल्याने दोघे दुचाकीस्वार जागीच ठार

बीड स्पीड न्यूज 

बीड_कारखाण्याकडून उचल घेऊन परत येत असताना चारचाकी वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना सायंकाळी घडली. घटनेची माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोपट मस्के आणि गहिनीनाथ मस्के असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.महाजनवाडी फाटा येथे भरधाव वेगातील इंडिका कार (एम.एच. 16 ए.टी. 960) ने दुचाकी (एम.एच. 13 3973) या दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील पोपट मस्के आणि गहिनीनाथ मस्के हे दोघे जागीच ठार झाले.घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन दोन्ही मयतांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात हलविले होते. दरम्यान भरधाव कारने पाठीमागून दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा बळी गेला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा