Subscribe Us

header ads

तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला; तरुण गंभीर जखमी ग्रामस्थांची पोलिस अधिक्षकांकडे धाव ; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

बीड स्पीड न्यूज 

गेवराई_तालुक्यातील कुंभारवाडी येथून मादळमोही येथे सामान खरेदीसाठी निघालेल्या कृष्णा बबन पायघडे याला अडवून अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना बेदम मारहाण करत गंभीर जखमी केल्याची घटना रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मादळमोही येथे घडली आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई करत त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे केली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील कुंभारवाडी येथील कृष्णा बबन पायघडे हा तरुण 23 ऑक्टोबरच्या रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कुंभारवाडी येथून मादळमोही येथे सामान खरेदीसाठी गेला होता. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अज्ञात लोकांनी त्यांना धारदार शस्त्राने मारहाण केली. या प्राणघातक हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून डोक्याला दहा टाके पडले आहेत. मादळमोही परिसरात सातत्याने गुंडप्रवृत्तीचे लोक विनापरवाना शस्त्र बाळगून सर्वसामान्यांवर हल्ला चढवतात. या भागात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या हल्ल्या प्रकरणातील दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे भागवत पायघडे, सुभाष कबाडे, कृष्णा जाधव, महादेव जाधव, प्रमोद जाधव, अशोक सरडे, अशोक जाधव यांच्यासह आदींनी केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा