Subscribe Us

header ads

उपजिल्हाधिकारी आघावचा अटकपूर्व जामिन बीडच्या सत्र न्यायालयाने फेटाळला

बीड स्पीड न्यूज 

बीड_आष्टी तालुक्यातील चिंचपूर येथील देवस्थान जमीन घोटाळ्यातील आरोपी उपजिल्हाधिकारी प्रकाश आघावचा अटकपूर्व जामिन सोमवारी बीडच्या सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. आघावच्या  जामीन अर्जावरील युक्तिवाद शुक्रवारी पूर्ण झाला होता. न्यायालयाने सोमवारी निर्णय देणार असल्याचे जाहीर केले होते. आज हा जामिन फेटाळण्याचा निर्णय देण्यात आला. यामुळे आघावच्या अडचणी वाढल्या आहेत.आष्टी तालुक्यातील चिंचपूर येथील देस्थान जमीन घोटाळ्यात तब्बल १५ आरोपी झाले आहेत. यात बडतर्फ उपजिल्हाधिकारी डॉ. एन आर शेळके आणि उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यातील डॉ. एन आर शेळकेला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली होती, त्याला गुरुवारी जामीन मिळाला आहे. तर यातील आरोपी असलेल्या उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव याने अटकपूर्व जामिनासाठी बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर बीडचे सत्र न्यायाधीश आर. एस. पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान न्यायालयानेआघाव याला अंतरिम जामीन  केला आहे. शुक्रवारी या जामीन अर्जावरील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला. यात वक्फ बोर्डाच्या वतीने देखील अझहर अली यांनी जामिनाला आक्षेप घेत बाजू मांडली. न्यायालयाने सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर हे प्रकरण आदेशाची राखून ठेवले होते. सोमवारी न्या. आर. एस. पाटील यांनी हा जामिन अर्ज फेटाळला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा