Subscribe Us

header ads

मानकुरवाडी येथे एकाला जबर मारहाण

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे

वाकनाथपुर प्रतिनिधी_मानकुरवाडी येथे मुलाने पत्नीने आणि सुनेने संगणमत करून एकाला जबर मारहाण करण्यात आली आहे.बीड तालुक्यातील मानकुरवाडी येथे राहत असणारे आत्माराम काशिनाथ जाधव यांनी शेळ्या विकल्या होत्या शेळ्या विकलेले पैसे आम्हाला का देत नाहीस असे म्हणत मुलगा रामेश्वर आत्माराम जाधव. ज्ञानेश्वर आत्माराम जाधव .पत्नी यशोदाबाई आत्माराम जाधव. आणि सुन कविता ज्ञानेश्वर जाधव.या चौघांनी  संगणमत करून आत्माराम जाधव यांना कुऱ्हाडीचा दांड्याने कुऱ्हाडीच्या तुब्याने मारहाण केली तसेच पायावरती दगडांनी मारहाण केली. आणि शिवीगाळ करत तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.
या घटनेनंतर आत्माराम जाधव यांनी पिंपळनेर पोलिस ठाण्यात धाव घेतली असून रामेश्वर आत्माराम जाधव.  ज्ञानेश्वर आत्माराम जाधव. यशोदाबाई आत्माराम जाधव. कविता ज्ञानेश्वर जाधव . यांच्या विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात कलम.३२४.३२३.५०४.५०६.३४ भा. द. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलिस नाईक सोनवणे साहेब हे करत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा