Subscribe Us

header ads

पिंपळनेर येथे ४५ वर्षीय पुरुषाची गळफास घेऊन आत्महत्या

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे

वाकनाथपुर प्रतिनिधी_बीड जिल्ह्यातील आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. रोज कोठेना कोठे कोणीतरी कोणत्या ना कोणत्या कारणाने आत्महत्या करत आहे.अशीच घटना बीड तालुक्यातील पिंपळनेर येथे घडली आहे.पिंपळनेर येथे महादेव ज्ञानोबा जाधव (वय ४५) वर्ष  यांनी काल पिंपळनेर येथे राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पी .एस .आय. सहाय्यक फौजदार गर्जे साहेब. पोलीस नाईक घुमरे साहेब  यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड येथील आरोग्य केंद्रात पाठवला आज सकाळी शोकाकुल वातावरणात जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला महादेव जाधव यांनी आत्महत्या का केली याचे कारण मात्र समजु शकले नाही पिंपळनेर पोलीस ठाण्यात जाधव यांच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली पुढील तपास पिंपळनेर पोलीस करत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा