Subscribe Us

header ads

गायब विरोधक दसरा-दिवाळी बघून येतात, धनंजय मुंडेंचा पंकजांना टोला

 बीड स्पीड न्यूज

बीड : मागील वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन लागले तेव्हापासून जनतेतून गायब असलेले विरोधक दसरा-दिवाळी बघून येतात. एक दिवस लोकांमध्ये गेले की दुसऱ्या दिवशी सर्दी खोकला येतो. आणि परत निघून जातात, असा टोला सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री धनंजय मुंडे  यांनी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे  यांचा नाव न घेता लगावला. सिरसाळा (ता. परळी) येथे उपबाजारपेठ अंतर्गत गाळे बांधकाम प्रसंगी श्री. मुंडे बोलत हेाते. बीडमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भाजपने केलेल्या धरणे आंदोलनात पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अकल्याणकारी नेते अशी टीका करुन जिल्ह्यात  माफियाराजला सत्ताधाऱ्यांचे पाठबळ असल्याची टीका केली होती. त्याला धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्र दिले.श्री.मुंडे म्हणाले, आम्ही पहिल्या दिवसापासून मदत करण्याच्या भूमिकेत आहोत. शेकडो रुग्णांना कोविड काळात मदत केली. हजारो कुटुंबांना अन्न धान्य पुरवले, हजारोंना मोफत रेमडीसीवीर उपलब्ध करून दिले. त्यात काही भाजपचे कार्यकर्तेपण होते. पण आम्ही केलेली मदत या हाताची त्या हाताला कळू देत नाही, असा आमचा स्वभाव आहे. आणखी बोलणार आहे, सगळं आजच संपवत नाही, असा इशारा देत वैद्यनाथ सुरू होणार का शेतकऱ्यांना सांगा, असा सवालही त्यांनी केला. एकीकडे मतदारसंघातल्या संस्था समृद्ध होत आहेत तर दुसरीकडे हजारो शेतकऱ्यांची आशास्थान असलेला वैद्यनाथ साखर कारखाना वाईट अवस्थेत आहे. तो यावर्षी सुरू होणार आहे का असे किमान एखादे ट्विट करून तरी सांगावे, असे म्हणतच या भागातील शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहणार नाही याची पूर्ण जबाबदारी घेऊ, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा