Subscribe Us

header ads

लिंबागणेश येथिल आठवडी बाजारास भरघोस प्रतिसाद

बीड स्पीड न्यूज 

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

बीड प्रतिनिधी_गेली दोन वर्षापासून कोरोनामुळे बंद असलेला आठवडी बाजारास आज गुरूवार रोजी लिंबागणेश येथुन आठवडी बाजारास प्रारंभ झाला झाला असून सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी राधाबिशन शर्मा यांना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ.संजय तांदळे आणि डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, शेख युनुस च-हाटकर यांनी आठवडे बाजारासह जनावरांचे बाजार भरविण्यास परवानगी देण्यात यावी म्हणून लेखी निवेदन देत आठवडी बाजार भरविण्यात येणार असल्याची कल्पना लेखी निवेदनाद्वारे केली होती, त्यानुसार आज लिंबागणेश येथे विविध ठिकाणचे दुकानदार, व्यापारी बाजारात दुकान घेऊन आले होते, दैनिकातुन तसेच सोशल मिडिया द्वारे बाजारास येण्याचे निमंत्रण दिले होते. 

रविवारी नेकनुर येथे प्रतिकात्मक आठवडी बाजार तर लिंबागणेश येथुन आठवडे बाजारास प्रारंभ:-डाॅ.गणेश ढवळे 
_____
 बीड जिल्ह्य़ातील कोरोनाची परिस्थाती सध्या नियंत्रणात असल्याने  रात्रीपर्यंत दुकाने, शाळा, महाविद्यालये, प्राथनास्थळे, हाॅटेल, माॅल तसेच विविध पक्षाचे कार्यक्रम, आंदोलने, मेळाव्यास परवानगी असताना ग्रामिण भागातील आठवडे बाजारास बंदी आणून आधीच संकटात सापडलेल्या शेतकरी-व्यापारी यांना आर्थिक उलाढाल ,बाजारहाट, देवाणघेवाण आदिसाठी आठवडे बाजार हीच सुविधा असून साखर कारखान्यावर जाणारे ऊसतोड मजुरांना बैल खरेदी-विक्री साठी आठवडे बाजार अत्यावश्यक असुन तात्काळ चालु करणे आवश्यक असल्याने आठवडे बाजार सुरू होणे गरजेचं आहे. यामुळे रविवारी नेकनुर येथे सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, शेख युनुस च-हाटकर, संदिप जाधव, जितेंद्र शिंदे, संतोष शिंदे,शेख आरश्मीद, विलास राऊत, अतित निर्मळ, सय्यद जाहेद, शेख शाहीनवाज, इमरोज पहेलवान, सिकंदर तांबोळी, सुनिल काळे, शेख रफुभाई, बबन ढाकणे, शेख राजु, शेख मुखिद आदिंनी प्रतिकात्मक बाजार भरवला होता. त्याचाच पुढील भाग म्हणून लिंबागणेश येथे आठवडी बाजार भरविण्यात आला. 

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर 
मो. नं.८१८०९२७५७२

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा