Subscribe Us

header ads

बीडमध्ये काँग्रेसला खिंडार! राजकिशोर मोदींचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

बीड स्पीड न्यूज 

मुंबई_बीड काँग्रेसचे तत्कालिन जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत मोदी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.अजित पवार यांनी या प्रवेशाने राष्ट्रवादीची ताकत जिल्ह्यात वाढली आहे. याचा फायदा केज विधानसभा मतदारसंघात होईल असे सांगितले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे,राज्य मंत्री संजय बनसोडे , आ. संदीप क्षीरसागर , आ. बाळासाहेब आजबे ,आ. सतीश चव्हाण, आ. संजय दौंड ,शेख मेहबूब , राष्ट्रवादीचे बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला.अंबाजोगाईतून आता भाजप हद्दपार झाला पाहिजे असेही मुंडे म्हणाले. केज विधासभा मतदारसंघावर सुद्धा आता राष्ट्रवादीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असेही मुंडे म्हणाले. तसेच आजच्या प्रवेशाने जुन्या कार्यकर्त्यांनी अस्वस्थ होण्याची आवश्यकता नाही, सर्वांना न्याय मिळेल. नवे जुने काही नाही, आपण सारे राष्ट्रवादी आहोत असे मुंडे म्हणाले.राजकिशोर मोदी यांनी यावेळी महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे , राज्य मंत्री संजय बनसोडे यांनी आम्हाला सातत्याने विकासकामात मदत केली, त्यावेळी पक्ष पहिला नाही . त्यामुळेच विकासासाठी आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करीत आहोत. काँग्रेस सोडताना वेदना होतात पण समविचारी पक्षातच प्रवेश करीत आहोत. शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात चांगले काम करून दाखवू असे मोदी म्हणाले. यावेळी माजी आ. सय्यद सलीम, माजी आ. राजेंद्र जगताप, डॉ. नरेंद्र काळे यांचीही उपस्थिती होती.यावेळी विष्णुपंत सोळंके , प्रकाश सोळंकी , राजेश इंगोले , महादेव धांडे यांच्यासह अनेकांनी मोदी यांच्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा