Subscribe Us

header ads

मतीमंद मुलीवर अत्याचार करणार्‍यास आठ वर्ष सक्तमजुरी बीड येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री.के.आर. पाटील यांचा महत्त्वपूर्ण निकाल

बीड स्पीड न्यूज 

बीड प्रतिनिधी_मतीमंदि मुलीवर अत्याचार केल्याची घटना दि.24 मार्च 2016 मध्ये शिरुर तालुक्यात घडली होती. या प्रकरणातील आरोपी दिलीप वामन रोकडे यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश - 3 के.आर. पाटील यांनी दि.21 रोजी दोषी ठरवून आठ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व दहा हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.मतीमंद मुलीवर उपचार करण्याचे कारण सांगत दिलीप रोकडे हा मुलगी राहत असलेल्या वस्तीवर दि.23 मार्च 2016 रोजी आला होता. त्याने मुलीच्या आईला तुमच्या मुलीस आठ दिवसात निट करतो. माझा बर्‍याच लोकांना गुण आल्याचे सांगितले. त्यानुसार दि.24 मार्च 2016 रोजी मुलीची आई मुलीला घेवून दिलीप रोकडे याच्या घरी गेली. त्यावेळी दिलीप रोकडे याने तुम्ही इथेच बसा, मी मुलीला ओढ्यात नेऊन तिच्यावर लिंबु कापुन टाकतो असे सांगितले. त्यानुसार दिलीप रोकडे मुलीला घेवून गेला व तिच्यावर अत्याचार केले तसेच मारहाण केली. तेथून परतल्यानंतर मुलीच्या आईला हा प्रकार लक्षात आला. त्याने मुलीला याबाबत विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक तानाजी दराडे यांनी केला व जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.सदर प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश - 3 श्री.के.आर. पाटील यांच्या न्यायालयात झाली. सदर आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षातर्फे एकूण 12 साक्षीदार तपासण्यात आले. सदर प्रकरणात पिडीत मुलगी ही मतीमंद होती असा वैद्यकीय अधिकार्‍याचा सबळ पुरावा समोर आला व इतर साक्षीदार, परिस्थितीजन्य पुरावे व कागदपत्राचे अवलोकन केले. तसेच सहाय्यक सरकारी वकील अनिल भ.तिडके यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन अति.सत्र न्यायाधीश - 3 के.आर. पाटील यांनी आरोपी दिलीप रोकडे यास कलम 376 (1) भादवि प्रमाणे दोषी धरुन आठ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व दंड, दंड न भरल्यास 3 महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच कलम 323 प्रमाणे एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व दंड न भरल्यास एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात पैरवी अधिकारी पो.हे.कॉ.चौधरी व पो.हे.कॉ.शिवाजी डोंगरे यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा