Subscribe Us

header ads

पुण्यात धारदार शस्त्राने वार करून अंबाजोगाईच्या तरुणाचा खून!

अंबाजोगाई प्रतिनिधी_  बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील मगरवाडी येथे  एका 38  वर्षीय  तरुणाचा पुण्यात खून केल्याची घटना घडली आहे.  या घटनेनंतर मारेकरी फरार झाले असून याप्रकरणी अज्ञात एका जणाविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील मगरवाडी येथील  संतोष विश्वनाथ माने (वय 38, रा.मगरवाडी, ता.अंबाजोगाई) असे त्या मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नी (वय 35) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात  इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात व्यक्तीने संतोष माने यांच्या कपाळावर धारदार हत्याराने वार करून त्यांना गंभीर जखमी करत त्यांचा खून केला. ही घटना चूडोबानगर, हूलावळे बेंद्रे वस्ती येथे तुषार साखरे यांच्या चाळीमध्ये भरदिवसा घडली. या घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा