Subscribe Us

header ads

साखर आयुक्त साहेब कारखाने शेतकऱ्यांना का ? फसवतात याचा विचार करा नंतर ऊसतोडणी मजुरांवर पैसे मागितले म्हणून कारवाई करा----- जिल्हाध्यक्ष बप्पासाहेब

 बीड स्पीड न्यूज


बीड प्रतिनिधी_बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील ऊसतोडणी मजुराराच्या मुलाने आझाद हिंद संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पत्रकार बप्पासाहेब भांगे यांनी साखर आयुक्त यांस प्रतिउत्तर.11/10/2021 ला ऊसतोडणी कामगारांच्या संदर्भात साखर आयुक्तांनी एक निर्णय घेतला होता. की मुकादम ऊसतोडणी कामगारांनी शेतकऱ्यांना ऊसतोडणी साठी  पैसे मागीतले की कामगारावर कारवाई केली जाईल . 
परंतु  साखर आयुक्तांना येवडच सांगायच आहे की कारखाने शेतकऱ्यांना फसवत नाहीत का ?शेतीअधिकारी व मेन मुकादम हे लेबरच्या नावाखाली करखण्याला फसवतात ,कारखाने नुकसान भरपाई म्हणून शेतकर्यांचे पैसे वेळेवर देत नाहीत. किंवा जेवडी नुकसान ऊसतोडणी कामगारांच्या नावाने झाली तेवडे पैसे शेतकरी बांधवांना कमी देतात.साखर आयुक्त कारखान्याच्या फायद्या साठी काम करतात का ?ऊसतोडणी मजूर व शेतकऱ्यांच्या भल्यासाठी साखर आयुक्त आहे.साखर आयुक्त कारखान्याच्या हिताचे काम करतात असे मत देखील बप्पासाहेब भांगे यांनी केले  कारखाण्याकडून शेतकरी , यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे.  हे साखर आयुक्तांना माहिती आहे का ? ते सांगावे सतत ऊसतोडणी मजुर फसवतात असे नाही ऊसतोडणी मजूर मोठ्या प्रमाणात कष्ट करतात आपली उपजीविका भागवण्यासाठी आपल्या पोटासाठी पैसे मागतात, म्हूणून ऊसतोडणी मजुरांवर कारवाई  करणार का ? ऊसतोडणी मजूर हे शेतकरी नाहीत का ? याचा विचार साखर आयुक्तांनी करावा.ऊसतोडणी मजूर हे 70 टक्के शेतकरी आहेत . हे देखील साखर आयुक्त्यांनी विसरू नये.ऊसतोडणी साठी 500 रु प्रति  टन भाव द्या ऊसतोडणी मजुर शेतकऱ्यांना एकही रुपया मागणार नाही.ऊसतोडणी मजुर अहोरात्र काबाड कष्ट करतो , आपली मुले पाचाटात टाकुन 4 ते 5 महिने जीव घेणा कष्ट करून जीवन कसे बसे जगतात मग या कष्टाळू ऊसतोडणी मजुर यांच्यावर कारवायी कशामुळे .ऊसतोडणी मजुरांना स्वातंत्र्य  का नाही ?
सर्व ऊसतोडणी मजुरांनी त्यांच्या संघटनांनी एकत्रित येऊन याकडे लक्ष द्या नाहीतर ऊसतोडणी मजुर फार काळ टिकणार नाही.ऊसतोडणी मजुरांचा नेता म्हणून घेणारे त्यांच्या जिवावर राजकारण करणारे लोकप्रतिनिधी कुठे आहेत ?ऊसतोडणी मजुराकडे पक्त मतापूरते येतात का ?आझाद हिंद ऊसतोडणी संघटनेचे जिल्ह्याध्यक्ष  बप्पासाहेब भांगे यांनी असे मत प्रसिद्धी पत्रकामध्ये मांडले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा