Subscribe Us

header ads

चाऊस जंगल परिसरात पाण्याची पाईप टाकून पाण्याची अडचण दूर करा---- मोहम्मद खमरोद्दिन

 बीड स्पीड न्यूज

बीड प्रतिनिधी_ बालेपीर भागातील प्रभाग 11 मधील चाऊस जंगल तोहिद मस्जिद परिसरात नगर परिषदेची पाण्याची पाईप लाईन नसल्या कारणास्तव येथील नागरिकांना बोअरच्या पाण्याचा वापर करावा लागत असल्याने या परिसरात नगर परिषदेने पाण्याची पाईप लाईन टाकून येतील नागरिकाची पाण्याची अडचण दूर करण्याची मागणी बीड जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागचे बीड शहराध्यक्ष मोहम्मद खमरोद्दीन यांनी नगर परिषद चे मुख्यधिकारी यांच्याकडे केली आहे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात मोहम्मद खमरोद्दिन यांनी म्हटले आहे की बीड शहरातील बालेपीर परिसरातील चाऊस जंगल तोहिद मस्जिद अमन पार्क परिसरात नगर परिषदेची पाण्याची पाईप लाईन नसल्याने येथील नागरिक बोअरच्या पाण्याचा वापर करत आहेत यामुळे भविष्यात त्यांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहू शकतो या मुळे या परिसरात पाण्याची पाईप लाईन आत्या गरजेची आहे नगर परिषद प्रशासनाने याची दखल घेऊन या परिसरात पाण्याची पाईप लाईन टाकून येथील नागरिकांना न्याय देण्याची मागणी मोहम्मद खमरोद्दिन यांनी नगर परिषद प्रशासनाकडे केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा