Subscribe Us

header ads

गेवराई क्राईम ब्रँच पोलीस असल्याचा बनाव करून दोघा भामट्यांनी व्यापाऱ्याला 1 लाखाला लुटले; घटना सीसीटीव्हीत कैद

 बीड स्पीड न्यूज

गेवराई प्रतिनिधी_आम्ही क्राईम ब्रँचचे पोलिस आहोत, आम्हाला तुमची चौकशी करायची आहे, असे म्हणून दोन तोतयांनी गेवराई येथील एका आडत व्यापाऱ्याला १ लाख रुपयाला गंडविल्याची घटना मंगळवारी घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान हा सर्व प्रकार मोंढा भागातील जय हनुमान मशिनरीसमोर घडला असून चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. याप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी की, गेवराई येथील महेश काँलनीत वास्तव्यास असलेले गंगाभिषण बिहारीलाल भुतडा ( वय 59 वर्ष ) यांचे मोंढा येथे श्रीनिवास भुसार धान्य खरेदीचे दुकान आहे. दरम्यान मंगळवारी भुतडा हे घराकडे जात असताना मोंढा वाटेत त्यांना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अडवून आम्ही क्राईम ब्रँचचे पोलिस आहोत, आम्ही रात्री 5 ते 6 लाखांचा गांजा पकडला आहे, त्यासंदर्भात तुमची चौकशी करायची असून तुम्हाला आमच्या साहेबांनी बोलावले आहे असे म्हणत व्यापारी भुतडा यांच्या गळ्यातील दोन ग्रँमची चैन, 5 ग्रँमची अंगठी व नगदी रक्कम असा जवळपास 1 लाखांचा मुद्देमाल घेऊन आरोपींनी पोबारा केला. हा सर्व प्रकार मोंढा भागातील जय हनुमान मशिनरी समोर घडला असून तेथील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी भुतडा यांच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा