Subscribe Us

header ads

आरोपीने मुलीवर कोयत्याने तब्बल ४४ वेळा केले वार; कोणीही त्याची केस लढू नका; कुटुंबाचा आक्रोश

 बीड स्पीड न्यूज

पुणे_पुण्यामध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीच्या हत्येमुळे सध्या खळबळ माजली आहे. बिबवेवाडी परिसरात कबड्डी खेळत असताना कोयत्याने वार करुन तिची हत्या करण्यात आली. या धक्कादायक घटनेमुळे पुणे हादरलं असून एकच खळबळ उडाली आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपीची केस कोणी लढू नये असं सांगत आक्रोश व्यक्त केला आहे. फास्ट ट्रॅक कोर्टात लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान मुलीवर आरोपीने ४४ वेळा वार केल्याची माहिती मुलीच्या मामाने दिली आहे.तीन महिन्यापूर्वी आरोपीने मुलीला त्रास दिला होता. तेव्हा मी त्याला समज दिल्यानंतर तो शांत झाला होता. मात्र काल त्याने तिच्यावर वार करून खून केला. आरोपीला अडवण्याचा प्रयत्न तेथील मुलींनी केला. मात्र तो वार करीत राहीला. त्याने तिच्यावर ४४ वार केले आहेत. या आरोपीची केस कोणीही लढू नये आणि फास्ट ट्रॅक कोर्टातून लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी मागणी मयत मुलीचे मामा अमोल शिंदे यांनी केली आहे.काल सायंकाळच्या सुमारास मयत मुलगी कबड्डीचा सरावासाठी यश लॉन्स येथील परिसरात गेली होती.तेव्हा 

मुख्य आरोपीसह चौघे जण दुचाकीवरून तिथे गेले. मुलीस बाजूला घेऊन तिच्यावर कोयत्याने आणि चाकूने वार केले. या घटनेत तिचा मृत्यू झाला आणि त्यानंतर काही तासात मुख्य आरोपीसह चौघांना अटक करण्यात यश आले आहे. आरोपी मयत मुलीच्या घराशेजारी पाच वर्ष राहत होता. मात्र साधारण वर्षभरापूर्वी दुसरीकडे राहण्यास गेला होता. आरोपी मुलीच्या नात्यातील आहे. आरोपीने एकतर्फी प्रेमातून हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा