Subscribe Us

header ads

दोन गावठी कट्ट्यासह तीन जिवंत काडतुस केली जप्त ; गेवराई व बीड येथे स्थानिक गुन्हे पथकाची कारवाई

बीड स्पीड न्यूज 

गेवराई_ गावठी पिस्टल बाळगणाऱ्या एका जणास गेवराई तर बीड येथून एक अशा दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे व तीन जिवंत काडतुस जप्त करण्यात आले. तर हि कारवाई करताना दुसऱ्या एका कारवाईत तीन मोटारसायकलसह एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. दरम्यान मागील महिण्यातच गेवराई तालुक्यातील वडगाव फाटा येथे दोघांना गावठी पिस्टलसह दोघांना गेवराई पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यातच स्थानिक गुन्हे शाखेने काल केलेल्या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.शनिवार दिनांक 30/10/2021 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व पोलीस अंमलदार बीड जिल्हा हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीष वाघ यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, गेवराई येथील हॉटेलसाई प्रसाद, छत्रपती शिवाजी महाराज चौकात वैजिनाथ भाऊसाहेब थोरे (रा. शिवाजीनगर, गेवराई) नावाचा इसम उभा असुन तो विनापरवाना बेकायदेशीररित्या त्याच्या कंबरेला गावठी पिस्टल लावुन थांबलेला आहे, अशी माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांना बातमीच्या ठिकाणी पाठवून त्यास ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस जप्त करुन पो.स्टे. गेवराई येथे गुरनं 496/2021 कलम 3/25 भारतीय हत्यार कायदयाप्रामणे गुन्हा दाखल केला आहे.तसेच दुसरी कारवाई पो.स्टे. बीड शहर येथे इसम नामे विजय सखाराम गायकवाड रा. माळापुरी यांच्याकडुन एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुस जप्त करुन पोस्टे बीड शहर गुरनं 208 / 2021 कलम 3/25 भारतीय हत्यार कायदयाप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कारवाई करत असताना सरकारी दवाखाना बीड समोरुन मोटर सायकल चोरी करणारा संशईत इसम शेख अमीर शेख समीयोदीन (रा. झमझम कॉलनी, बीड) यास ताब्यात घेतले. यानंतर त्याच्याकडे अधिक विचारपुस केली असता त्याने सरकारी दवाखाना, बीड येथुन तीन मोटर सायकल चोरी केल्याचे सांगितले. यानंतर त्यांच्याकडुन 3 मोटर सायकलसह 1 लाख 30 हजारचा मुद्देमाल जप्त करुन पो.स्टे. बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी वरीष्ठाच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अमलदारांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा