Subscribe Us

header ads

धबधब्यात बुडून 17 वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

बीड स्पीड न्यूज 

अंबाजोगाई_ दिवाळीच्या सुटीनिमित्त आजोळी येथे आलेल्या १७ वर्षीय विद्यार्थ्यांचा अंबाजोगाई येथील नागनाथ मंदिराच्या मागील धबधब्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दि. १० रोजी सायंकाळी घडली. अमर अनिल राडकर  (वय १७) वर्ष रा. जोडजवळ, जि. लातूर ) असे त्या मृत मुलाचे नाव आहे.दिवाळीच्या सुटीनिमित्त तो आजोळी आडस  ता. केज  येथे आला होता. बुधवारी दुपारी तो दर्शनासाठी दोन मावस भावांसह अंबाजोगाईच्या नागनाथ मंदिरात गेला होता. त्यानंतर सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास तिघेही मंदिराच्या पाठीमागील धबधब्याकडे फोटो काढण्यासाठी गेले. यावेळी अमर पाण्यात उतरला, परंतु खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. यानंतर त्याच्या भावांनी आरडाओरडा केली, परंतु जवळपास कोणीच नसल्याने अमरला मदत मिळू शकली नाही. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने शोध घेऊन रात्री ८.३० वा. अमरचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठविण्यात आला. अमर हा त्याच्या मातापित्यांचा एकुलता एक मुलगा असल्याचे समजते. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा