Subscribe Us

header ads

माजलगाव येथे एसटी कर्मचाऱ्यांचा मूलबाळासह तहसील कार्यालयावर मोर्चा


बीड स्पीड न्यूज 

माजलगाव_ माजलगाव आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी आज सकाळी आपल्या मुलाबाळांसह तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. कर्मचाऱ्यांचे कुटुंब सुद्धा या आंदोलनात सहभागी झाल्याने आता विविध मागण्यांसाठी सुरु असलेला हा लढा आता आणखी तीव्र होताना दिसत आहे.विविध मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचा सध्या संप सुरू आहे. या संपाचा भाग म्हणून येथील कर्मचाऱ्यांनी सकाळी 11 वाजता आगारातून आपल्या पत्नी , पती व मुलांसह भव्य मोर्चा काढला. या वेळी सर्व कर्मचाऱ्यांचा डोक्यावर टोप्या होत्या. या टोप्यावर 'लढा विलीनीकरणाचा' असे लिहिलेले होते.यावेळी कर्मचाऱ्यांचे चिमुकले सुद्धा सहभागी झाले होते. तेही मागण्यांसाठी घोषणा देतांना दिसून येत होते. या मोर्चाला विविध संघटना व पक्षांनी पाठिंबा देत मोर्चात सहभागी झाले  हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. याठिकाणी  तहसीलदार यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा