Subscribe Us

header ads

उमरद खालसा येथे किराणा दुकानात चोरी

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे

वाकनाथपुर प्रतिनिधी_बीड तालुक्यात चोरीच्या घटना सतत घडत आहेत चोरीच्या घटनेने तालुक्यात भीतीचे वातावरण झाले आहे.शहराच्या ठिकानी चोऱ्या होत होत्या आता खेड्या पाड्यातील चोऱ्या होऊ लागल्या आहेत.बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असणारे उमरद खालसा येथे मंगळवारी रात्री घडली आहे. अनन्या  किराणा स्टोअर्स आणि ओम साई कलेक्शन या दोन दुकानात मंगळवार रात्री च्या दरम्यान 

अज्ञात चोरट्याने पत्रा उचलून आत प्रवेश केला आणि काही तेलाचे डबे आणि आणखीन काही सामान घेऊन पोबारा केला ही बाब सकाळी दुकान मालक सचिन परसकर यांच्या निदर्शनास आली असता लगेच  पिंपळनेर पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पी एस आय सानप साहेब. आणि पोलीस नाईक सोनवणे साहेब घटनास्थळी दाखल 

झाले घटनास्थळी पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज बघितली असता चोरटे माल घेऊन पसार झाल्याचे दिसत आहे. घटनास्थळाची पाहणी करून  पंचनामा करत सचिन परसकर यांच्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्या विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पिंपळनेर पोलीस करत आहेत या चोरीच्या प्रकरणाने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा