Subscribe Us

header ads

घरांमधून रोख रकमेसह; सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा येवज लुटून बीडमध्ये जबरी चोरी.

बीड स्पीड न्यूज 

बीड_ रात्रीचे जेवण करून घरात झोपलेल्या शिक्षकाच्या घरात प्रवेश  करत अज्ञात चोरट्याने कडीकोंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरामधून रोख रकमेसह सोने-चांदीच्या दागिन्यांची जबरी चोरी केल्याची घटना बीड शहरातील पिंपरगव्हण रोडवरील श्री रविशंकर मतिमंद शाळेजवळ आज पहाटे घडली. चोरट्यांनी या शिक्षकासह अन्य एकाच्या घराचे कुलूप तोडून नगदी रोख रकमेसह सोन्या  चांदीचे दागिने चोरून नेले. ७ लाख ५५ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरून नेले असून घटनास्थळी शिवाजीनगर पोलिसांनी श्वानपथकासह भेट दिली.बीड शहरात गेल्या काही  दिवसापासून चोऱ्यांच्या घटनेत वाढ होत असून आज पहाटे शहरातील पिंपरगव्हण रोड लगत असलेल्या श्री रविशंकर मतिमंद शाळेजवळ दोन घर फोडल्याची घटना घडली. संतोष गोपीनाथ मेहेत्रे ( वय ४२ ) हे शिक्षक आपल्या परिवारासह रात्रीचे जेवण करून झोपले असता अज्ञात चोरट्यांनी मेहेत्रे यांच्या घरात प्रवेश करत कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. कपाटाचे लॉक तोडून चोरट्यांनी आतमधील राणी हार, मोहळ माळ, लॉकेट, कानातील रिंग, झुंबर, देवाची सटवाई, मणिमंगळसुत्र, कानातील जोड सह २५ हजार रोख रक्कम सह   गंठण, लॉकेट, अंगठी, कानातील वेल, कानातील झुंबर, कानातील फुलांसह सोने-चांदीचे दागिने लुटून नेले.यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा याच गल्लीत राहणारे अजयकुमार उद्धवराव धोंगडे यांच्या घराकडे वळवला. घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी त्यांच्या घरातूनही सोन्याची अंगठी, रोख रक्कम सह दोन्ही शिक्षकांच्या घरातून चोरट्यांनी तब्बल ७ लाख ५५ हजार ६०० रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केला. सदरची चोरी सकाळी मेहेत्रे कुटुंब झोपेतून उठल्यानंतर उघडकीस आली तेव्हा त्यांनी शिवाजीनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली असता काल शिवाजीनगर पोलीसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. श्वान पथकाला पाचारण केले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा