Subscribe Us

header ads

आ.संदिप भैय्या क्षीरसागर मांजरसुंबा मंडळातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न; शिलमदत व पुर्नवसनच्या उपसचिवांची घेतली भेट; 7 हजार हेक्टरवरील शेतीचे नुकसान

बीड स्पीड न्यूज 

बीड (प्रतिनिधी):- ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बीड विधानसभा क्षेत्रातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून मदत महाविकास आघाडी सरकारने जाहिर केली. मात्र शासकीय निकष व तांत्रिक अडचणी व मांजरसुंबा महसूल मंडळ यातून वगळण्यात आले. या महसूल मंडळात सात हजार हेक्टरपेक्षा अधिक शेतकर्‍यांचे नुकसान झाले असून संबंधित शेतकर्‍यांना विशेष बाब म्हणून मदत मिळावी यासाठी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांचा पाठपुरावा सुरू आहे. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, मदत व पुर्नवसन विभागाचे उपसचिव यांचीही भेट घेवून या बाबत पाठपुरावा केला. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या या पाठपुराव्यातून मांजरसुंबा महसूल मंडळातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत देण्याची कार्यवाही शासनस्तरावर सुरू आहे.जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या पीकांचे मोठे नुकसान झाले. यात महाविकास आघाडी सरकारने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदतही जाहिर केली. ती मदत शेतकर्‍यांच्या खात्यावर येत आहे. मात्र शासकीय निकष व तांत्रिक बाबीमुळे मांजरसुंबा महसूल मंडळ वगळण्यात आले. 7 हजार हेक्टरपेक्षा जास्त शेतकर्‍यांचे नुकसान झालेले असतांना त्यांना मदत मिळणार नाही हे लक्षात येताच तातडीने मदत मिळण्यासाठी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी पाठपुरावा सुरू केला. महसूल, कृषी व इतर विभागाकडून पंचनामे करून घेत 7 हजारपेक्षा अधिक नुकसान पाहता मदत देण्यात यावी असा अहवाल बीड जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्या मार्फत शासनास दि.28.10.2021 रोजी पाठवण्यात आला. याबाबत आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी दि.27.10.2021 रोजी जिल्हाधिकारी बीड, विभागीय आयुक्त यांना पत्र देवून सदर महसूल मंडळातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत मिळणे गरजेची असल्याचे विनंती केली होती. मांजरसुंबा महसूल मंडळामध्ये सततच्या पावसामुळे अतिवृष्टीने 7 हजार 148 हेक्टर नुकसान झाल्याचे क्षेत्रीय पंचानाम्यामध्ये प्रशासकीय स्तरावर नियमानुसार अहवाल दिलेला आहे. परंतू महसूल व वनविभाग शासन निर्णय क्र. सीएलएस/2020-21/प्र.क्र.242/एम 3 दि.26.10.2021 मध्ये फक्त अतिवृष्टी झालेल्या 65 मिलीपेक्षा जास्त पाऊस ज्या महसूल मंडळात 24 तासात झालेला आहे त्या महसूल मंडळात अनुदान वितरीत करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. परंतू मांजरसुंबा महसूल मंडळात देखिल दि.1 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर व 21 ते 19 सप्टेंबर या कालावधीत 281 एम.एम. म्हणजे सरासरीच्या 200 टक्के पावसाची नोंद झालेली आहे. पंचनाम्याच्या अंती नुकसान झालेले आढळून आले आहे. त्यामुळे महसूल मंडळाच्या 7 हजार 148 हेक्टर नुकसान पाहता अनुदानास पात्र ठरावे असा अहवाल विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी शासनास दिला असून त्यानुसार विशेष बाब म्हणून सदर मांजरसुंबा मंडळातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत देण्यात यावी अशी मागणी बीडचे आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी शासनाकडे केली आहे. याबाबत आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू असून त्यांनी मुंबई नुकतीच मदत व पुर्नवसन विभागाचे सचिव धारूरकर यांची भेट घेवून या बाबत पाठपुरावा केला. आ.संदिप भैया क्षीरसागर यांच्या माध्यमातून व पाठपुराव्यातून मांजरसुंबा मंडळातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत मिळणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा