Subscribe Us

header ads

महादेव नागरगोजे यांची भाजपा सोशल मिडीया सेलच्या सहसंयोजकपदी निवड

बीड स्पीड न्यूज 

बीड ः प्रतिनिधी_भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, खासदार प्रितमताई मुंडे यांच्या आदेशावरुन भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते महादेव नागरगोजे यांच्या कार्याची दखल घेवून सोशल मिडीयाच्या जिल्हा सहसंयोजकपदी निवड करण्यात आली. खासदार प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते महादेव नागरगोजे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.वडगाव गुंधा येथील भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते महादेव नागरगोजे हे गत अनेक वर्षांपासून सक्रीयपणे कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेवून लोकनेत्या पंकजाताई मुंडे, खासदार प्रितमताई मुंडे यांच्या सूचनेवरुन भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के व सोशल मिडीया सेलचे जिल्हाध्यक्ष अमोल वडतीले यांनी महादेव नागरगोजे यांची सोशल मिडया सेलच्या सहसंयोजकपदी निवड केली. त्यांना नियुक्तीचे पत्र खासदार प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते देण्यात आले. या निवडीबद्दल महादेव नागरगोजे यांनी लोकनेत्या पंकजाताई मुंडे, खासदार प्रितमताई मुंडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, सोशल मिडीया सेलचे जिल्हाध्यक्ष अमोल वडतीले यांचे आभार मानले असून पक्षाने सोपवलेली जबाबदारी यशस्वीपणे सांभाळण्याचा प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. या निवडीबद्दल नागरगोजे यांचे विकास गोरे, हरिष खाडे, चैतन्य मुंडे, प्रदिप उगलमुगले, अशोक खाडे, अंकुश नागरगोजे, विकास लांडगे, जयराम बांगर, मोहन वाघमारे, विकास गोटे, नवनाथ डावकर, सुनील काळे, विवेक पाखरे, जालिंदर पाखरे, राजेश माने, शंकर मोरे, उल्हास बांगर, परमेश्‍वर शिंदे, रंजित वाघमारे, धर्मराज जाधव, शाहु माने, राजेश नागरगोजे, चंद्रकांत नागरगोजे, प्रफु ल्ल शिंदे, राजु पवने, दादाशिव नागरगोजे, दत्ता सानप आदिंनी अभिनंदन केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा