Subscribe Us

header ads

संस्थाचालकांच्या प्रश्‍नांवर पाठपुरावा करणार डॉ.महादेव मुंडे यांचे प्रतिपादन; मराठवाडा प्रभारीपदी निवडीबद्दल सत्कार

बीड स्पीड न्यूज 

बीड_खासगी नर्सिंग कॉलेज चालकांच्या विविध प्रश्‍नांच्या सोडवणूकीसाठी माझ्यावर संघटनेेने जबाबदारी सोपवली आहे. ती जबाबदारी समर्थपणे पार पाडत विविध प्रश्‍नांच्या सोडवणूकीसाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन डॉ.महादेव मुंडे यांनी केले.प्रायव्हेट नर्सिंग कॉलेज असोसिएशनचे बीड जिल्हाध्यक्ष महादेव मुंडे यांची संघटनेच्या मराठवाडा प्रभारीपदी नुकतीच निवड करण्यात आली. याबद्दल बीड येथील विश्रामगृहावर त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नर्सिंग कॉलेज संस्थाचालक उपस्थित होते. यावेळी बोलतांना डॉ.महादेव मुंडे म्हणाले, इंडियन नर्सिंग कौन्सीलचे सदस्य तथा महाराष्ट्र नर्सिंग कौन्सीलचे माजी चेअरमन डॉ.रामलिंग माळी (मुंबई), प्रायव्हेट नर्सिंग कॉलेज असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.बाळासाहेब पवार (औरंगाबाद), महाराष्ट्र नर्सिंग कौन्सीलचे सदस्य राहुल जवंजाळ (अकलुज), संघटनेचे समन्वय शंकर आडसुळ (औरंगाबाद), धैर्यशील मोहिते पाटील (अकलुज) यांनी चर्चा करुन मराठवाडा प्रभारीपदी माझी निवड केली आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून केलेल्या कामाची दखल घेवून ही जबाबदारी दिली आहे. मराठवाड्यातील खासगी नर्सिंग कॉलेजच्या विविध मागण्यांसंदर्भात प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे डॉ.मुंडे यांनी यावेळी सांगितले. बैठकीस संस्थाचालक शंकर आडसुळ, अरुण कदम, डॉ.प्रशांत देशपांडे, आनंद क्षीरसागर, दिलीप मुंडे, आजीनाथ गित्ते, परवेज, तेली, हावळे, दिलीप विघ्ने यांची प्रमुख उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा