Subscribe Us

header ads

ग्रामपंचायत पोट निवडणूका खुल्या वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

बीड स्पीड न्यूज 

बीड,दि. 26 (जिमाका):- राज्य निवडणूक आयोगाने निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रमापंचायतीतील रिक्त झालेल्या पदांच्या पोट निवडणूकांसाठी पारंपारीक पध्दतीने राबविण्यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे. आणि त्याबाबतची आदर्श आचारसंहिता निवडणूकीचा कार्यक्रम घोषीत झाल्याचे वेळेपासून  लागू झालेली आहे. निवडणूका असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये, निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणूकींचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील. या निवडणूका शांततेत व खुल्या वातावरणात पार पाडण्याबाबत तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत उपाययोजना करणे आवश्यक आहे.  आणि राज्य निवडणूक आयोगाचे आदेश वरील संदर्भ क्र.2 नुसार निवडणूक आयोगाकडून शस्त्रास्त्रांबाबत तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत भाग-5, पोलीस विभागाशी संबंधीत मधील मुद्दा क्र. 01 अन्वये निवडणूका जाहीर झाल्यापासून शस्त्रास्त्रे बाळगण्यास निर्बंध घालण्याबाबत सूचना आहेत.बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या पोट निवडणूकां शांततेने व खुल्या वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूका असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रामधील सर्व शस्त्र परवाना धारकांची शस्त्रे (बँक / महत्त्वाची कार्यालये/ संस्था/ विद्युत केंद्र व इतर महत्त्वाचे कार्यालयाचे शस्त्र परवान्यावरील शस्त्र वगळून) निवडणूक प्रक्रिया शांततेने व खुल्या वातावरणात पार पाडण्याचे दृष्टीने जमा करणे आवश्यक आहे. आचार संहिता कालावधीसाठी जमा करण्याची कार्यवाही पोलीस अधीक्षक बीड यांनी तात्काळ करावी. तसेच आचारसहिंता कालावधी संपल्यानंतर त्यांची शस्त्रे परक देण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हादंडाधिकारी राधाबिनोद शर्मा , बीड यांनी दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा