Subscribe Us

header ads

खुंड्रस येथील अल्पवयीन मुलीला फुस लाऊन पळवले

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे

वाकनाथपुर प्रतिनिधी_बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणारे खुंड्रस या गावातील एका अल्पवयीन मुलीला गावातीलच तरुणाने फुस लाऊन पळवल्याची घटना घडली आहे.या बाबत अधिक माहिती अशी की  खुंड्रस येथील रवींद्र मिसाळ  या तरुणाने  गावातीलच एका अल्पवयीन मुलीला फुस लाऊन पळऊन नेल्याची घटना दिनांक २० नोव्हेंबर  रोजी घडली आहे. या बाबत मुलीच्या वडिलांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात धाव घेतली असून आरोपी रवींद्र मिसाळ याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. मुलीच्या वडिलांच्या तक्रारी नुसार पिंपळनेर पोलीस ठाण्यात रवींद्र मिसाळ याच्या विरोधात कलम ३६३ भा. द.वि . नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पिंपळनेर पोलीस ठाण्याचे बिट अमालदार अरुण अवचर साहेब हे करत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा