Subscribe Us

header ads

दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कुलमधून भविष्यातील आदर्श नागरिक घडतील!संविधान दिवस उत्साहात साजरा; अनेक मान्यवरांची उपस्थिती;

बीड स्पीड न्यूज 

परळी,(प्रतिनिधी):-विद्यार्थ्यांनी सादर केली बोधपूर्ण नाटिकासंविधान दिवसाचे औचित्य साधून दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कुल येथे विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांना संविधान व मूलभूत हक्क आणि कर्तव्य यांची जाणीव करून देणे आणि प्रत्यक्ष आयुष्य जगत असताना या मूलभूत हक्कांची व करावयाची जाणीव ठेऊन आपली वर्तनुक कशी असावी याबद्दल मार्गदर्शन करण्याच्या हेतूने एक उत्कृष्ट अश्या नाट्याचे सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणातून भारतीय नागरिकांच्या संविधानिक अधिकारांविषयी व त्या संदर्भातील कायद्यां विषयीची माहिती देण्यात आली. या सादरीकरणात एकूण 32 विद्यार्थ्यांनी सहभागी होत आपल्या अभिनयाने सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन पोलीस निरीक्षक मारुती मुंडे, प्रमुख उपस्थिती म्हणुन अ.भा. पत्रकार परिषदेचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय काळे, 9 मराठीचे प्रतिनिधी संभाजी मुंडे व पत्रकार महादेव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापक तेजेस कुमार यांनी केली.कार्यक्रम प्रसंगी बोलत असताना प्रमुख उपस्थितीती असलेले पत्रकार दत्तात्रय काळे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेने या देशातील सर्वसामान्य माणसापासून सर्वांनाच समान अधिकार दिलेले आहेत. स्वतंत्र, समता, बंधुता आणि न्याय या तत्वाचा प्रामुख्याने राज्यघटनेत अंतर्भाव करण्यात आला आहे. संपूर्ण जगातील लिखित अशी भारताची सर्वात मोठी राज्यघटना आहे. घटनेची उद्देशिका सर्वांना मुखोद्गत असणे आवश्यक असून राज्यघटनेचा जागर होणे आवश्यक आहे. दिल्ली वर्ल्ड 

पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनि आजच्या कार्यक्रमात सादर केलेली नाटिका अत्यंत बोधपूर्ण असून शालेय विद्यार्थ्यांना घटनेतील मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये या माध्यमातून काळातील आणि त्यांच्यात ते रुजतील असा विश्वास व्यक्त केला.शाळा प्रशासनाने राबवलेल्या उपक्रमाचेही त्यांनी तोंडभरून कौतुक केले.तसेच पोलीस निरीक्षक मारोती मुंडे यांनी शाळेची वाटचाल खुप चांगल्या दिशेने सुरु असुन संस्था चालकांचे या संस्थेबद्दलचे ध्येय खुप मोठे आहेत व नक्किच या शाळेच्या माध्यामातून आदर्श विद्यार्थी व आदर्श नागरिक घडवले जातील असे म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांना संविधाना विषयी मोलाचे मार्गदर्शन केले व उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमात सर्व उपस्थितांनी भारतीय राज्य घटनेच्या प्रास्तावनेचे वाचन केले व 26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व शूरवीरांना आदरांजलीही वाहिली. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या अध्यक्षा सौ. उषा किरण गीत्ते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले व या उपक्रमास यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.राज्यघटनेने या देशातील सर्वसामान्य माणसापासून सर्वांनाच समान अधिकार दिलेले आहेत. स्वतंत्र, समता, बंधुता आणि न्याय या तत्वाचा प्रामुख्याने राज्यघटनेत अंतर्भाव करण्यात आला आहे. संपूर्ण जगातील लिखित अशी भारताची सर्वात मोठी राज्यघटना आहे. घटनेची उद्देशिका सर्वांना मुखोद्गत असणे आवश्यक असून राज्यघटनेचा जागर होणे आवश्यक आहे. दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनि आजच्या कार्यक्रमात सादर केलेली नाटिका अत्यंत बोधपूर्ण असून शालेय विद्यार्थ्यांना घटनेतील मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये या माध्यमातून काळातील आणि त्यांच्यात ते रुजतील असा विश्वास व्यक्त केला.शाळा प्रशासनाने राबवलेल्या उपक्रमाचेही त्यांनी तोंडभरून कौतुक केले.तसेच पोलीस निरीक्षक मारोती मुंडे यांनी शाळेची वाटचाल खुप चांगल्या दिशेने सुरु असुन संस्था चालकांचे या संस्थेबद्दलचे ध्येय खुप मोठे आहेत व नक्किच या शाळेच्या माध्यामातून आदर्श विद्यार्थी व आदर्श नागरिक घडवले जातील असे म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांना संविधाना विषयी मोलाचे मार्गदर्शन केले व उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमात सर्व उपस्थितांनी भारतीय राज्य घटनेच्या प्रास्तावनेचे वाचन केले व 26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व शूरवीरांना आदरांजलीही वाहिली. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या अध्यक्षा सौ. उषा किरण गीत्ते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले व या उपक्रमास यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा