Subscribe Us

header ads

अस्मानी संकटानंतर महावितरणची बिल वसुली त्वरीत थांबवा--प्रहार राज्यातील शेतकरी महावितरण विजबिलाणे पुन्हा संकटात--हनुमंत तोंडे

बीड स्पीड न्यूज 

‌धारुर प्रतिनीधी:- महावितरण कंपनीने सध्या ग्राहकांकडून वसुली मोहीम सुरू केली आहे.ग्राहकाला भरमसाठ बिलाचा सामना करावा लागत आहे,त्यामुळे महावितरण कंपनीने शहरी व ग्रामीण भागात सुरू केलेली वसुली मोहीम  आणि दोन ते चार दिवसांमध्ये पाण्याची वीज कनेक्शन तोडणी त्वरित थांबवावी.शेतकरी वर्गाला वीज बिल भरण्यासाठी मुदत वाढून द्यावी. अन्यथा महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने हनुमंत तोंडे यांनी निवेदन द्वारे तहसिल कार्यालय दिला आहे.सध्या ऐन रब्बी पिक्काच्या तोंडावर महावितरण कंपनीने ग्रामीण व शहरी भागातील वीज कनेक्शन तोडणी  सुरू केली आहे. तर काही पावसामुळे पिके वाया गेली आहेत.अगोदरच सामान्य नागरिक आर्थिक संकटात आलेले आहेत.त्यात मात्र अजून  आर्थिक भुर्दंड सामान्य नागरिकांच्या माथ्यावर महावितरण कंपनीने लादला आहे.गेल्या दोन वर्षांपासून सामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडला आहे. कोरोना महामारीमुळे उद्योग धंदे, व्यापार बंद पडले.त्याचा अतिशय वाईट परिणाम व्यापारीवर्ग, शेतकरीवर्ग, मजूरांवर झाला असून त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.त्याचा परिणाम सामान्य नागरिकांवरही झालेला आहे.  एकीकडे माणसाच्या हाताला काम नाही,त्यातून त्याला आर्थिक संकटाशी सामना करावा लागत आहे.कोरोना महामारीमुळे सर्वजण हैराण झाले. अनेकांची कामे गेली,सामान्य नागरिकाकडे पैसा येणार तरी कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे.महावितरण कंपनीच्या  वसुलीला विरोध नसून सद्या परस्थिती काळात कंपनीने वसुली थांबून तोडलेले वीज कनेक्शन पूर्ववत करावेत आणि शहरी व ग्रामीण भागातील कनेक्शन तोडणी त्वरित थांबवावी. येत्या काही दिवसांत कंपनीने वीज कनेक्शन तोडणी न थांबवल्यास महावितरण कार्यालयामोर आंदोलन करून महावितरण कंपनीचे कार्यालय बंद करू तसेच होणाऱ्या परिणामास तहसिल कार्यालय,महावितरण कार्यालय  जबाबदार असतील,असा इशारा प्रहार चे जिल्हा सरचिटणीस हनुमंत तोंडे,युवा ता.अध्यक्ष अक्षय मस्के,पत्रकार विशाल सराफ,ऑल इंडिया पॅथर सेनाचे बिड जिल्हा संघटक विश्वास वाव्हळ,शिवसेना तालूका सचिव बाबासाहेब सराफ, विकास काजळे,तोंडे विशाल,तोंडे भास्कर, तोंडे रविंद्र आदि निवेदनाद्वारे दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा