Subscribe Us

header ads

रोटरी क्लब सेंट्रल सदस्यांनी आपला परिवारच्या ज्येष्ठांसमवेत केली दिवाळी साजरी

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी | बीड_ कुटूंब अाणि कुटूंबातील प्रत्येक सदस्य हा कुटूंबात असेल ताे प्रत्येक क्षण दिवाळी सारखा असताे. विविध अडचणीमुळे काही ज्येष्ठांना त्यांच्या कुटूंबात स्थान मिळालेले नाही मात्र बीड तालुक्यातील कळसंबर येथील आपला परिवार वृध्द-अनाथ आश्रमात त्यांना अाधार दिला जात अाहे. या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ बीड सेंट्रलच्या टीमने क्लब च्या वतीने दिवाळी चा फराळ, सिंटेक्स टाकी, महिनाभर पुरेल इतका सर्व किराणा साहित्य देत दिवाळी साजरी केली. 
रोटरी क्लब ऑफ बीड सेंट्रलच्या टीमने बीड तालुक्यातील कळसंबर येथील आपला परिवार वृध्द-अनाथ आश्रम येथे भेट देऊन ज्येष्ठांसमवेत दिवाळी साजरी केली. यावेळी क्लब चे अध्यक्ष अजय नाना घोडके, सचीव सुकेश राव, चार्टर्ड प्रेसिडेंट संदेश लोळगे, ज्ञानेश्वर तांबे, गणेश वाघ, डॉ . सचीन वारे, विश्वास शेंडगे, कचरु चांभारे, रवी उबाळे, समाधान कुलकर्णी, प्रमोद करमाळकर, चंद्रकांत काळे यांच्यासह रोटरी क्लब ऑफ सेंट्रल चे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी आपला परिवार वृध्द-अनाथ आश्रमच्या संचालीका मनीषा पवार यांनी क्लब चे आभार मानले तसेच ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. क्लब च्या वतीने दिवाळी चा फराळ, सिंटेक्स टाकी, महिनाभर पुरेल इतका सर्व किराणा साहित्य देण्यात आले.सामाजिक सेवेचा वसा जपत दरवर्षी रोटरी क्लब बीड सेंट्रल यांच्याकडून दिपावलीच्या औचित्याने अनाथ, निराधारांसाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेस मदत करण्यात येते.  यावर्षी रोटरी 

क्लब बीड सेंट्रल यांच्याकडून कळसंबर येथील आपला परिवार वृद्धाश्रमास मदत केली.  येथील वृद्धाश्रमात एकूण चौदा निराधार वृद्ध राहत असल्याचे प्रकल्प संचालिका  मनिषा पवार यांनी सांगितले. सर्व वृद्धांची विनामोबदला,सामाजिक दात्यांकडून आलेल्या मदतीवरच सांभाळ केला जातो.क्लबचे माजी अध्यक्ष कचरू चांभारे यांनी आपल्या मनोगतात वृद्धाश्रम तयार होणं हे कुटुंब व्यवस्था खालावल्याचे लक्षण असल्याचे सांगितले पण त्या सोबतच वृद्धांची सेवा करण्याचे अवघड काम संचालिकेने स्वीकारल्याबद्दल आपला परिवार संस्थेचे कौतुकही केले. वृद्धावस्था ही व्यक्तीच्या जीवनातील रमणीय संध्याकाळ आहे. पण बदलत्या जीवनशैलीमुळे हीच संध्याकाळ अनेकांच्या आयुष्यात वेदनादायी ठरत आहे. आपला परिवारसारख्या सेवावृत्ती संस्थांमुळे म्हातारपण आल्याची भावना सुखाची वाटते आहे. या प्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष अजय घोडके, माजी अध्यक्ष संदेश लोळगे, ज्ञानेश्वर तांबे,पत्रकार रवी उबाळे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद करमाळकर यांनी केले तर आभार माजी अध्यक्ष सुकेश राव यांनी मानले.
-----
दानशूर व्यक्तींकडून,संस्थाकडून मदतीची अपेक्षा
 
रोटरी क्लबकडून आपला परिवार वृद्धाश्रमास एक पाण्याची टाकी, फराळाचे पदार्थ व एक महिन्याचा किराणा देण्यात आला. आपला परिवारात सोलापूर, बीड, अहमदनगर,परभणी जिल्ह्यातील वृद्ध राहतात. आयुष्याची संध्याकाळ समवयस्क व समदुःखी सोबत्यांसोबत जाणार असल्याचा आनंद इथं आहे, असं एका वृद्धाने सांगितले. कळसंबरच्या माळरानात दोन एकर जागेत हा वृद्धाश्रम असून नैसर्गिकरित्याच इथे प्रसन्नता आहे. सदर आश्रम नव्यानेच सुरू झालेला असलेला असल्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींकडून,संस्थाकडून मदतीची अपेक्षा आहे. 
----
वृद्धांसोबत गप्पा मारत ,मोकळेपणाने संवाद

रोटरी परिवार सामाजिक सेवेला एक महत्वपूर्ण अंग समजून काम करतो. त्यामुळेच क्लबकडून सतत सेवाभावी काम घडत असते. संचालिका मनिषा पवार, त्यांचे पती, भाऊ, भावाची पत्नी पूर्णवेळ वृद्धांच्या सेवेत असतात. आवश्यक तेवढेच घ्यायचे व जास्तीचे आलेले गरजवंत एकल महिला, निराधार महिला यांना वाटप करायचे अशी दातृत्वता या संस्थेकडून जपली जाते. वृद्धांची सेवा करत असताना परिसरातील अत्यंतिक गरीब व निराधार दहा मुलींच्या लग्नात आपला परिवारने भांडी व इतर सामान दिले आहे.रोटरी क्लबचे सदस्य लहान मुलांसाठी या ठिकाणी आले होते.वृद्धांसोबत गप्पा मारत ,मोकळेपणाने संवाद साधत सर्वांच्या छान गप्पा रंगल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा