Subscribe Us

header ads

रुग्णवाहिका आणि कारची समोरा समोर धडक; एक ठार तीन गंभीर जखमी

बीड स्पीड न्यूज 

बीड_ बीडवरून कोल्हापुरकडे जात असलेली भरधाव कार आणि नगरवरून बीडकडे येत असलेल्या रूग्णवाहिकेची समोरासमोर जोराची धडक झाल्याची घटना आज सकाळी 8.30 वाजेच्या दरम्यान धामणगाव रोडवर सुर्डी फाटा येथे घडली. अपघातात कार मधील एक जण जागीच ठार झाला तर अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना अहमदनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अवधुत नंदकुमार गरगटे रा.इचलकरंजी (31) असे मृताचे नाव आहे.सोमवारी दुपारी पुण्याला रूग्ण घेऊन  गेलेली रूग्णवाहिका (MH.20.EG.5130) रुग्णास सोडून आज पहाटे बीडला परत येत होती. तर बीडवरून एक कार (MH.09. BM.5986 ) कोल्हापूरकडे सकाळी निघाली होती.  दरम्यान, आज सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान सुर्डी फाट्यावरील वळणावर कार आणि रुग्णवाहिका यांची समोरासमोर धडक जोरदार धडक झाली. अपघातात कार मधील अवधुत गरगटे हा जागीच ठार झाला. तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने अहमदनगर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. मात्र,जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.  रूग्णवाहिका चालक संतोष सुरवसे रा.बीड हा किरकोळ जखमी झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा