Subscribe Us

header ads

5 हजार राशन कार्ड गायब प्रकरणात कारवाईचे संकेत.

बीड स्पीड न्यूज 

बीड_ जिल्हा पुरवठा विभागातुन साडे ४ महिन्यापुर्वी अचानक ५००० रेशनकार्ड गायब झाल्यानंतर खळबळ उडाली होती, सर्वच माध्यमातूनतुन याविषयी आवाज उठवण्यात आला होता त्यानंतर दि.२३ सप्टेंबर रोजी पहिल्यांदा लेखी तक्रार दिली त्यानंतर अपर जिल्हाधिकारी यांनी गुन्हे दाखल करण्याचे तोंडी दिलेले आदेश हवेतच जिरले, याविषयी वरिष्ठ पातळीवर तब्बल १४ वेळा लेखी तक्रारी आणि ६ वेळा आंदोलन केल्यानंतर अखेर शेवटी ३ डिसेंबर २०२१ रोजी जागतिक अपंग दिनानिमित्त आंदोलनाचा ईशारा दिल्यानंतर दि. ३ डिसेंबर रोजी पुरवठा विभागातील कर्मचा-यांने आंदोलनस्थळी ५००० रेशनकार्ड गायब प्रकरणात सविस्तर चौकशी करण्यात आली असून चौकशी अंती दोषी कर्मचा-यांविरूद्ध प्रशासकीय कार्यवाही करण्याबाबतचा परीपुर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी बीड मार्फत उप आयुक्त पुरवठा विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांच्याकडे सादर करण्यात आल्याचे लेखी पत्रक दिले.विभागीय आयुक्तांनी ३ वेळा आदेश देऊन सुद्धा कारवाई न केल्याबद्दल जिल्हाधिकारी यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी दि.३ डिसेंबर रोजीच्या आंदोलनाद्वारे केल्यानंतर चौकशी अहवाल उप आयुक्त पुरवठा कार्यालय औरंगाबाद यांना सादर करण्यात आला गेली ४ महिने केवळ जिल्हा पुरवठा आधिकारी, तहसिलदार यांना पत्रक पाठवुन वेळ निभावुन नेत होते, कारवाई करण्यास जाणीवपुर्वक टाळाटाळ केली जात होती.बीड जिल्हा पुरवठा विभागातुन ५००० रेशनकार्ड गायब प्रकरणात विभागीय आणि स्थानिक दैनिकातुन सामाजिक कार्यकर्ते यांच्या आंदोलनानंतर बातम्यांना ठळक प्रसिद्धी मिळाली त्यामुळेच याचे संपुर्ण श्रेय दैनिकांचे संपादक व टीमचे आहे त्याबद्दल सर्वांचेच आभार, या आंदोलनात सहभागी सहकारी शेख युनुस च-हाटकर, बाळासाहेब मोरे, संदिप जाधव, डाॅ.संजय तांदळे, नितिन सोनावणे, एम. एस. युसुफभाई, सय्यद ईलियास, मोहम्मद मोईज्जोदीन, शेख मुबीन,शेख मोईन,सय्यद आबेद, सय्यद युसुफोद्दिन, आदि सहका-याच्या जिद्दीचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा