Subscribe Us

header ads

राक्षस भुवन (देवीचे) ते कुर्ला हा रस्ता नुसता खोदून ठेवला; रस्त्याचे काम कधी होणार!!?

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे

वाकनाथपुर प्रतिनिधी_बीड तालुक्यातील रस्त्यांना डांबर दिसत नाही खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे हेच कळत नाही बीड ते पिंपळनेर डांबरी रस्ता बनवण्यासाठी नागरीक रस्त्यावर उतरले आहेत तरी देखील हा रस्ता जश्यास तसा आहे ग्रामीण भागातील नागरिकांना बीड ला जाण्यासाठी पूर्ण खड्ड्यातून जावे लागत आहे कोणतेही लोकप्रतिनिधी. किंव्हा बांधकाम विभाग ग्रामीण भागाकडे लक्ष देत नाहीत अशी चर्चा ग्रामीण भागात होत आहे.आणि काही रस्ते मंजूर होऊन देखील त्या रस्त्याचे 

काम जाणुन बुजून लवकर होत नाही.कुक्कडगाव ते कुर्ला हा रस्ता इतका खराब आहे की  कोणतेही वाहन चालवताना जीव मुठीत घेऊन चालावे लागते कुर्ला येथे पाचवी ते दहावी पर्यंत शाळा आहे पण या रास्त्या मुळे या भागात ( एसटी )बस सेवा बंद आहे बस बंद असल्याने या भागातील विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नाहीत तरी ही हा रस्ता बनत नाही पाहिलाच हा रस्ता खुप खराब आहे. आणि आता रोड बनवण्याचे खडी किंव्हा कोणतेही मटेरियल आलेले नसून पंधरा ते वीस दिवसापूर्वीच हा रस्ता रक्षास भुवन (देवीचे) ते कुर्ला हा रस्ता  जेसीबी लाऊन उकरुन ठेवला आहे मटेरियल येण्या अगोदरच रस्ता उकरुन ठेवल्याने आता तर या रस्त्याने मोटरसायकल ही चालवणे मुश्कील झाले आहे. रोड चे मटेरियल कधी येणार आणि रोड कधी सुरू होणार का रोड फक्त उकरुन ठेवतात असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा